शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘नॅक’ मूल्यांकन समिती उद्या येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:44 AM

‘नॅक’ने गेल्या वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान विद्यापीठाला भेट देऊन हे मूल्यांकन करण्याचे नियोजित केले होते. मात्र, कोरोनामुळे या नॅक समितीची भेट ...

‘नॅक’ने गेल्या वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान विद्यापीठाला भेट देऊन हे मूल्यांकन करण्याचे नियोजित केले होते. मात्र, कोरोनामुळे या नॅक समितीची भेट वर्षभर लांबली. या वर्षी जानेवारीमध्ये या समितीने दि. १४ ते १७ मार्च दरम्यान मूल्यांकनासाठी विद्यापीठाला भेट देत असल्याचे कळविले. त्यानुसार विद्यापीठाने मूल्यांकनाची तयारी सुरू केली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक आणि विविध ३४ अधिविभागांच्या सादरीकरणाचा अहवाल तयार झाला आहे. विद्यापीठ परिसराची स्वच्छता, इमारतींच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले. विद्यापीठातील फूटपाथ, झाडांवर पट्टे मारणे, आदी कामे शुक्रवारी सुरू होती. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख यांनी विविध अधिविभागांना भेटी देऊन तेथील सादरीकरणाच्या ठिकाणांची पाहणी करून तेथील तयारी जाणून घेतली. डॉ. शिर्के यांनी शुक्रवारी या अधिविभाग आणि प्रशासनातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना काही सूचना केल्या.

चौकट

दोन टप्प्यांत मूल्यांकन

संख्यात्मक आणि विश्लेषणात्मक अशा दोन टप्प्यांमध्ये नॅक मूल्यांकन होणार आहे. त्यातील ७० टक्के संख्यात्मक माहिती ‘नॅक’ला सादर केली आहे. उर्वरित ३० टक्के विश्लेषणात्मक मूल्यांकनासाठी समिती विद्यापीठाला भेट देणार असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

फोटो (१२०३२०२१-कोल-नॅक तयारी ०१ व ०२) : नॅक मूल्यांकन समिती शिवाजी विद्यापीठात रविवारी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य इमारतीच्या परिसरातील झाडांवर रंगाचे पट्टे मारण्याचे काम शुक्रवारी सुरू होते.

फोटो (१२०३२०२१-कोल-नॅक तयारी ०३ व ०४) : नॅक मूल्यांकन समिती शिवाजी विद्यापीठात रविवारी येणार आहे. त्यासाठी दूरशिक्षण केंद्राने या समितीसमोर सादरीकरणासाठीची तयारी पूर्ण केली आहे.