कोल्हापूर : निसर्गातील नाग, सर्प या प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत शुक्रवारी घरोघरी नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सध्या सर्वच मंदिरे बंद असल्याने घरातूनच नमस्कार करत खोबऱ्याची करंजी, दही भाताचा नैवेद्य दाखवण्यात आला.
श्रावणातील महत्त्वाचा सण असलेल्या नागपंचमीनिमित्त आदल्या दिवशी मातीच्या मूर्ती पूजन करून धपाटे, काळ्या वटाण्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. सणादिवशी खोबऱ्याचे किंवा पुरणाची करंजी, दही भाताचा नैवेद्य केला जातो. यानिमित्त घरोघरी नागाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. व गोडधोडाचा नैवेद्य करण्यात आला. यादिवशी महिला मंदिरात पूजन करून आल्यानंतर झोके घेण्याचा आनंद लुटतात. सध्या कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत, शिवाय लोकांच्या एकत्र येण्यावरही मर्यादा असल्याने महिलांनी घरातच हा सण साजरा केला. काही ठिकाणी महिलांनी झुल्याचा, फुगडीचा आनंद लुटला.
---
फोटो स्वतंत्र पाठवला आहे.
--