शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग: कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रस्ता भूसंपादनाचे ५४४ कोटी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 1:14 PM

परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार

कोल्हापूर : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या चोकाक ते आंबा टप्प्यातील भूसंपादनासाठी आतापर्यंत ५४४ कोटी ६१ लाख इतक्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची टक्केवारी ४५.१३ असून, जिल्हा भूसंपादन विभागाच्यावतीने युद्धपातळीवर नुकसानभरपाई वाटपाचे काम सुरू आहे. ते अधिक जलदगतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची विभागात नियुक्ती केली आहे. परिसरातील १२ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या अंदाजे साडेतीनशे हेक्टर जमिनी संपादन केल्या जाणार आहेत.नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यातील लांबी ७८ किलोमीटर असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते आंबा येथील भूसंपादन करण्यात येत आहे. त्यात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने १२०६.७२ कोटी रुपये भूसंपादन विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी ५४४ कोटी ६१ लाख वाटप विभागाने पूर्ण केले आहे.

यात मूळ निवाडे ४९ व अतिरिक्त निवाडे ६९ असे एकूण ११८ निवाडे पूर्ण झाले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्यासाठी आता गावनिहाय शिबिरे घेण्यात येत आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात ५५० अर्ज आले होते. तपासणी पूर्ण करून त्यांना मोबदला वाटप सुरू झाले आहे. ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहे ते अर्ज पुन्हा तलाठ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात गावनिहाय शिबिर ठेवण्यात आले आहे.

तालुकानिहाय बाधित गावांची यादीतालुका : गावशाहुवाडी : २५पन्हाळा : १०करवीर : ८हातकणंगले : ६एकूण : ४९ गावे

१० कोटी न्यायालयात जमाकाही शेतकऱ्यांच्या जमिनींचे न्यायालयीन वाद सुरू आहे. या वादाच्या प्रकरणातील १० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात येत आहेत.

तक्रारीत अडकले १५० कोटीजमिनीच्याबाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कौटूंबिक वाद आहेत. एकाच जागेवर अनेकांचा दावा आहे. अशी तक्रारीतील प्रकरणे सध्या बाजूला ठेवली जात आहेत. चार तालुक्यांपैकी हातकणंगले येथील ३८ कोटी करवीर मधील ४५ कोटी रुपये तक्रारीत अडकली आहेत. आणखी दोन तालुक्यांच्या तक्रारी काढण्याचे काम सुरू असून ही रक्कम जवळपास १५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले प्रकरण दाखल करून नुकसान भरपाई घ्यावी. व महामार्ग पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी भूसंपादन कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीnagpurनागपूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी