कोल्हापूर : दहीहंडी स्पर्धेसाठी लाखोंची बक्षिसे आणि जनतेचा उदंड प्रतिसाद लाभतो. त्यात अग्रक्रमाने धनंजय महाडिक युवा शक्तीतर्फे भरविली जाणारी दहीहंडी प्रसिद्धीस आली आहे तर गुजरी कॉर्नर येथील दहीहंडी उत्सवात एक वेगळे आकर्षण निर्माण करणारी ठरली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातील दहीहंडीची लोकप्रियताही वाढू लागली आहे. गोकुळाष्टमी अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने दहीहंडीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यात काही मंडळांना प्रमुख पाहुणी म्हणून ‘सैराट’फेम अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हवी आहे. शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाची दहीहंडी, राजारामपुरी नवव्या गल्लीतील विन ग्रुपची दहीहंडी, ताराबाई पार्क पितळी गणेश मंदिर चौकातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ), शिवाजी पेठेतील पंत बावडेकर आखाड्यासह लक्ष्मीपुरीतील धान्य व्यापारी मंडळासह गंगावेश येथे मोठ्या दहीहंडी असतात. या दहीहंडीची बक्षिसे लाखांच्या घरात असतात. या दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत. त्यातील काही मंडळांना प्रमुख पाहुणी म्हणून ‘सैराट’फेम अभिनेत्री आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू हवी आहे. मात्र, तिचे मानधन काही लाखांत आहे. त्यामुळे दहीहंडीच्या बक्षिसापेक्षा मानधनच अधिकच होत आहे. प्रामुख्याने ही गोविंदा पथके शिरोळ तालुक्यातील अजिंक्यतारा, गोडी विहीर, जय हनुमान, जय शिवराय, जय महाराष्ट्र, देवी पार्वती; सांंगली जिल्ह्णातील तासगाव येथील शिवगर्जना, शिवनेरी, नाईक ग्रुप, शिवाजी युवक, महारूद्र; निपाणी येथील एक-दोन गोविंदा पथके या लाखमोलाच्या दहीहंडी फोडण्यासाठी कोल्हापुरात दरवर्षी येतात.
कोल्हापूरच्या दहीहंडीला ‘आर्ची’ ची के्रझ
By admin | Published: August 19, 2016 12:25 AM