कोल्हापूर : कोल्हापूर ते सांगली या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिवसेनेने कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार असताना १९९५ मध्ये पुणे ते मुंबई हा द्रुतगती महामार्ग व्हावा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली संकल्पना सत्यात उतरली. या धर्तीवर कोल्हापूर ते सांगली या महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेने अनेक आंदोलने छेडली, हे काम अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली. या शिष्टमंडळात, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, साताप्पा भवान, महादेवराव गौड, सतीश मलमे, आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, धनाजी मोरे, धोंडिराम कोरवी, सूरज भोसले, राजकुमार पाटील, अण्णासाहेब बिलूरे, संजय वार्इंगडे, सुनील सांगवडे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
कोल्हापूर-सांगली रस्त्याला ठाकरेंचे नाव द्या :
By admin | Published: August 17, 2016 11:47 PM