कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील झडतीवेळी दोन मोबाईल व सीमकार्ड मिळाल्याप्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये तपासात आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी कारागृहात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.कळंबा कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज व कैद्यांच्या संशयास्पद हालचालींनुसार कारागृह प्रशासनाने मंगळवारी अचानक झडती घेतली. यावेळी दुधाच्या पिशवीतून शौचालयात लपवलेला तसेच अक्षय गिरी या बंदीने लपवलेले मोबाईल मिळाले. याप्रकरणी अभिमान विठ्ठल माने, विकास रामअवतार खंडेलवाल, शुक्रराज पांडुरंग घाडगे, अभि ऊर्फ युवराज मोहनराव महाडिक (सर्व सध्या कळंबा कारागृह) या मोक्कातील कारागृहात असणाऱ्या संशयितांवर गुन्हे दाखल केले. बुधवारी कारागृह प्रशासनाने बरॅकमधील इतर बंदींची तसेच वॉर्डनकडे चौकशी केली.मोबाईल कंपनीकडे कॉल डिटेल्सची मागणीकारागृहात सापडलेल्या सीमकार्डचा वापर पाचही संशयित करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्या सीमकार्डवरील कॉल डिटेल्सची मागणी संबंधित कंपनीकडे करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे. ते डिटेल्स येण्यासाठी किमान तीन-चार दिवसांत उपलब्ध होतील. शिवाय, कारागृहातील संशयित आरोपींना तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केली.
कारागृहातील मोबाईलप्रकरणी आणखी संशयितांची नावे पुढे येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 10:26 AM
Jail Crimenews Kolhapur-कळंबा मध्यवर्ती कारागृहातील झडतीवेळी दोन मोबाईल व सीमकार्ड मिळाल्याप्रकरणी पाचजणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये तपासात आणखी संशयितांची नावे निष्पन्न होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी कारागृहात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
ठळक मुद्देपोलिसांनी केला कारागृहात पंचनामा सीमकार्डवरील कॉल डिटेल्सची मागणी करणार