काेल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील व उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्या नावांची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाली. हातकणंगलेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नावही बैठकीत पुढे आले असून, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड हेही इच्छुक आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते. कोल्हापुरातून कोण इच्छुक असल्याबाबत विचारले असता, हसन मुश्रीफ हेच योग्य असून, सर्वपक्षीय नेते त्यांना मदत करु शकतात, असे आर. के. पोवार, ए. वाय. पाटील आदींनी सांगितले. ते नाही म्हटले तर के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील हा पर्याय असू शकतो. ‘व्ही. बी’ यांना छत्रपती घराण्याचे पाठबळ मिळू शकते. हातकणंगलेतून जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होऊ शकतात, असे बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सुचविले. यावर योग्य नाव सुचवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. रणवीर गायकवाडही येथून इच्छुक असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.‘उसन्या’मुळे पक्षाचे नुकसानगेल्या तीन निवडणुकीत उसने उमेदवार उभे केल्याने पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पक्षात काम करणाऱ्यांनाच संधी द्या, अशी मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केली.
उमेदवार आहे, पण शिवसेनेचा आहेसर्वच पदाधिकारी हसन मुश्रीफ यांच्या नावावर आग्रह होते. याबाबत त्यांनाच विचारले असता, अजून एक विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. मग, उमेदवार कोण? अशी विचारणा अजित पवार यांनी केली, यावर, उमेदवार आहे पण ते शिवसेनेत आहेत, असे अप्रत्यक्ष संजय घाटगे यांचे नाव सूचित केले.
‘कोल्हापूर’ची जागा सुटू शकते‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ वरील शिवसेनेने दावा केला असला तरी सध्या त्यांच्याकडे ते खासदार नाहीत. कोल्हापुरातील राजकीय स्थिती पाहिली तर ही जागा सुटू शकते, अशी चर्चा बैठकीत झाली.
दादा पुन्हा भडकलेकोल्हापूर शहरात पक्षाचे २५ नगरसेवकांहून १५ वर आले, आता काय अवस्था आहे. जिल्ह्यातही वाईट अवस्था असल्याने अजित पवार हे चांगलेच भडकले.