संदीप आडनाईककोल्हापूर : पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षिदार असलेले पन्हाळ्याचे सर्वात जेष्ठ नागरिक नाना बांदिवडेकर यांनी आज वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या नानांनी आज दिल्लीहून झूम अँपवरून नातेवाईकांचा गोतावळा जमवून त्यांच्याशी सवांद साधला.१५ आॅगस्ट १९४७ रोजी देशाच्या पहिल्या स्वातंत्रदिनाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभलेले नाना बांदिवडेकर सध्या नवी दिल्ली येथील मुलीकडे वास्तव्यास आहेत.गेल्या बावीस वर्षापासून ते पन्हाळा येथील सज्जा कोठी येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व समारंभाला आवर्जुन हजेरी लावतात.नाना बांदिवडेकर यांनी आज शंभरी पार केली. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे त्यानी देशातील आणि परदेशात विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथे राहणाऱ्या मुली, मुले, नातवंडे यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. सकाळी त्यांच्या मोठ्या मुलीने औक्षण करन केक कापून वाढदिवस साजरा केला.१९२० मध्ये त्यांचा जन्म झाला. कोल्हापूर स्टेट असताना १९४३ मध्ये ते पोलिस दलात दाखल झाले. १५ आॅगस्ट १९४७ रोजी ते गडहिंग्लज येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक होते. स्वातंत्र्यदिनाच्या पहिला ध्वजारोहण समारंभात त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्याचा सन्मान त्यांना लाभला होता. राष्ट्रीय ध्वजाला त्यांनी सर्वप्रथम सलाम केला.नाना बांदिवडेकर यांचा दोन वर्षांपूर्वी सर्वात ज्येष्ठ पोलिस अधिकारी म्हणून पन्हाळा पोलिसांनी सत्कार केला आहे. याशिवाय पन्हाळा भूषण, सिनियर सिटीजन असे काही पुरस्कारही मिळालेले आहेत. नानांना त्यांच्या सेवाकाळात पंडित जवाहरलाल नेहरु आणि लालबहादुर शास्त्री या देशाच्या पहिल्या दोन पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.
पन्हाळ्याच्या नाना बांदिवडेकरांनी केली शंभरी पार, ऑनलाईन साजरा झाला वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 8:08 PM
नाना बांदिवडेकर यांनी आज शंभरी पार केली. लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे त्यानी देशातील आणि परदेशात विशेषतः अमेरिका आणि कॅनडा येथे राहणाऱ्या मुली, मुले, नातवंडे यांच्याकडून शुभेच्छा स्वीकारल्या. सकाळी त्यांच्या मोठ्या मुलीने औक्षण करन केक कापून वाढदिवस साजरा केला.
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार, झूम ऐपवर जमला गोतावळा