शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना !

By admin | Published: February 10, 2017 9:50 PM

मदनराव मोहिते : त्यांचं जॅकेट जनताच उतरवेल; बाबांची दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ अजूनही तुटलेलीच

कऱ्हाड : आनंदराव पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही अडवून ठेवलंय. विधानपरिषदेची आमदारकी त्यांच्याच घरात. पुतण्या बाजार समितीवर संचालक. आता मिसरुड फुटलेल्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी ते उतावळे झालेत. नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना. पृथ्वीराजबाबांना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ मिळेना म्हणून वैतागूनच आपण त्यांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनमानी करणाऱ्या नानांचे जॅकेट जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली.विंग, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते, मुकुंद चरेगावकर, धोंडिराम जाधव, दाजी जमाले, वि. तु. सुकरे, श्रीरंग देसाई, सचिन पाचुपते, अनिल कचरे, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मदनराव मोहिते म्हणाले, ‘दक्षिणेत उरावर बसलेलं उंडाळ्याचं भूत गाडण्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करून पृथ्वीराजबाबांना विधानसभेला मदत केली. लोकं म्हणतात की दादा तुमच्यामुळे बाबा निवडून आले. मी तसं म्हणत नाही; पण पृथ्वीराजबाबांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याला यश आले. बाबा आमदार झाले. ते कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देतील, असं वाटत होतं. मात्र, बाबांची आणि दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ आजही जुळलेली दिसत नाही. दरबारी राजकारणात पारंगत असलेल्या बाबांना इथले राजकारण समजायला खूप वेळ लागेल. माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला त्या दोघांची कार्यपद्धती न पचणारी आहे. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला.’विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समाचार घेताना मदनराव मोहिते म्हणाले, ‘त्यांनी मतदार संघात किती संस्था काढल्या हा संशोधनाचा विषय आहे. एक रयत कारखाना काढला; मात्र तो मयत होतोय, असे वाटताच तो भाड्यानं चालवायला दिला. त्यांनी आता दक्षिणच्या सत्तेची स्वप्न पाहू नयेत.’ डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊ व जयवंतराव भोसले यांनी या भागात विकासाचं स्वप्न सत्यात उतरविण्याचं काम केलं; पण काहीनी आमच्यात संघर्ष पेटवून स्वत:ची पोळी भाजून घेतली. मात्र, यापुढे असं होऊ देणार नाही. मोहिते-भोसले परिवार एकदिलाने काम करेल. ’डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘नेहमीच मदनराव मोहिते यांचा आदर करीत आलो आहे. यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चुका सुधारून वाटचाल करणार आहे. आता आम्ही मनात काहीही न ठेवता एक झालोय. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही जुन्या काही गोष्टी विसरून कामाला लागावे. (प्रतिनिधी)दुसऱ्यांच्या कुबड्यांवर आमदार होता येत नाही...‘भोसले-उंडाळकर मैत्रिपर्वाची खिल्ली उडविताना आमदार व्हायचं असेल तर दुसऱ्यांच्या कुबड्यांवर होता येत नाही. आमदार होण्यासाठी स्वत:ची ताकद वाढवा, असं मी अतुलला पटवून सांगितलं. त्याला ते पटलेलं दिसतंय. म्हणून त्याने कुबड्या झुगारून दिल्या आहेत. आम्ही एकदा गाडलेलं भूत तुम्ही पुन्हा उकरून काढू नका,’ असे मदनराव मोहिते यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.यादवांचा काटा यांनीच काढलानानांना एकमेकांवर कुरघोड्या करण्याची खूप आवड. कऱ्हाड पालिका निवडणुकीत बाबांनी नानांना जरा बाजूला ठेवले. त्याचा राग मनात धरून यांनी राजेंद्र यादव यांचा काटा काढला. जयवंत पाटील यांना हा काटा लागता-लागता राहिला. नाही तर त्यांचीही विकेट त्यांनी घेतली असती. नानांच्या या उचापतीमुळे १६ नगरसेवक निवडून येऊनही बाबांच्या बंगल्याकडे फक्त एक नगरसेविकाच फिरकली. मनोमिलनात वाईट काय ?ज्यांच्यासाठी घरच्यांचा वाईटपणा घेतला, तुम्हाला निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनाच त्याची किंमत नसेल आणि मला व पर्यायाने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर अतुलसारख्या घरच्या उमद्या नेतृत्वाला मदत करण्यासाठी मनोमिलन केले तर त्यात वाईट काय ? असा सवाल करीत आता अतुल भोसलेला आमदार केल्याशिवाय आपण थांबायचे नाही, असे आवाहन मदनराव मोहिते यांनी यावेळी केले.भाऊंची राजकारण यांनीच संपवलेज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते हे आमचे साऱ्यांचे दैवत. पण त्यांचे राजकारण कोणी संपविले, हे साऱ्या जनतेला माहीत आहे. ज्यांना मदत केली त्यांनी निवडणुकीनंतर आपल्या ‘लाडक्या’ व्यक्तीवरच मदार ठेवली. त्यामुळे दक्षिणेतील राजकारणात स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत. यातून तरी नेते काहीतरी शिकतील का, असा चिमटा मदनराव मोहिते यांनी काढला.दुसऱ्यांच्या कुबड्यांवर आमदार होता येत नाही...‘भोसले-उंडाळकर मैत्रिपर्वाची खिल्ली उडविताना आमदार व्हायचं असेल तर दुसऱ्यांच्या कुबड्यांवर होता येत नाही. आमदार होण्यासाठी स्वत:ची ताकद वाढवा, असं मी अतुलला पटवून सांगितलं. त्याला ते पटलेलं दिसतंय. म्हणून त्याने कुबड्या झुगारून दिल्या आहेत. आम्ही एकदा गाडलेलं भूत तुम्ही पुन्हा उकरून काढू नका,’ असे मदनराव मोहिते यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.