जयसिंगपूर : नांदणी सहकारी बँकेच्या आर्थिक वर्षात ठेवीमध्ये वाढ होऊन बँकेने २०० कोटी ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. बँकेने ३ कोटी ६० लाखांचा ढोबळ नफा मिळवत प्रगती साधली आहे, अशी माहिती अध्यक्ष आप्पासाहेब लठ्ठे यांनी दिली.
बँकेने सभासदांना १३० कोटीची कर्जे वाटप केली आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करीत बँकेने विविध सुविधा सभासदांना दिल्या आहेत. बँकेने एनपीए ० टक्के राखला असून ३४५ कोटींचा व्यवसाय केला असल्याचे उपाध्यक्ष बाबासो टारे व सीईओ आर. पी. कसलकर यांनी सांगितले.
नांदणी बँकेच्या आणखीन तीन शाखा सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगून अध्यक्ष लठ्ठे म्हणाले, बँकेच्या प्रगतीचा आलेख वाढत जाऊन चालू अहवाल सालात ३०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करेल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी संजय वसवाडे, बापूसो नदाफ, बापूसो भगाटे, वसंत कारंडे, सदाशिव बुबणे, डॉ. एस. डी. पाटील, बाळकृष्ण देशपांडे, राजेंद्र खुळ, रमेश भुजूगडे, मलगोंडा पाटील, मोहन पाटील, देवाप्पा कांबळे, संतोष कलकुटगी, कपिल देमापूरे, विद्यासागर बस्तवाडे, साधना कोळी, त्रिशला धुळासावंत, सुलतान अपराध, रुस्तुम मुजावर उपस्थित होते.
फोटो - ०८०४२०२१-जेएवाय-०३-आप्पासाहेब लठ्ठे