कोल्हापूर : सर्वातील सर्वांत मोठा असलेल्या दिवाळीचा चार दिवसांचा मुख्य सोहळा यंदा दोनच दिवसांत संपणार आहे. शनिवारी (दि.१४) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.१६) दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आले आहेत. गुरुवारपासून वसुबारसने या सणाला सुरुवात होत आहे.यंदा अधिक महिन्यामुळे एरवी ऑक्टोबरमध्ये साजरी होणारी दिवाळी नोव्हेंबरच्या मध्यावर आली आहे. सणाला आता चार दिवस राहिल्याने घरोघरी खमंग फराळाची फोडणी, सजावटीची लगबग, आकाशकंदिल, पणत्या, दिव्यांची खरेदी अशी जय्यत तयारी सुरू आहे. सणाची सुरुवात वसुबारसने होते. त्यानंतर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन, दीपावली पाडवा, भाऊबीज असे सहा दिवस हा सोहळा रंगतो.यंदा गुरुवारपासून (दि.१२) दिवाळीची सुरुवात होत आहे. यादिवशी वसुबारस असून कृषी प्रधान संस्कृतीचे प्रतीक असलेल्या गाय-वासराचे पूजन केले जाते. शुक्रवारी (दि. १३) धनत्रयोदशी असून या दिवशी घराघरांत धन्याच्या राशीवर लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजन केले जाते. दारात दक्षिणेला दिवा लावून यमदीप दान केले जाते.शनिवारी (दि. १४) नरकचतुर्दशी असून यादिवशी अभ्यंगस्नान केले जाते. यंदा याच दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन असून रात्री साडेआठ वाजेपर्यंत याचा मुहूर्त आहे. सोमवारी (दि.१६) वर्षातील साडेतीन मुहर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दीपावली पाडवा आणि भाऊबीज आहे.
नरक चतुर्दशी-लक्ष्मीपूजन आणि पाडवा-भाऊबीज एकाच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:57 PM
diwali, kolhapurnews सर्वातील सर्वांत मोठा असलेल्या दिवाळीचा चार दिवसांचा मुख्य सोहळा यंदा दोनच दिवसांत संपणार आहे. शनिवारी (दि.१४) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.१६) दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आले आहेत. गुरुवारपासून वसुबारसने या सणाला सुरुवात होत आहे.
ठळक मुद्देनरक चतुर्दशी-लक्ष्मीपूजन आणि पाडवा-भाऊबीज एकाच दिवशीयंदा दिवाळीचा मुख्य सोहळा दोनच दिवसांत