नरंदे येथे आमदार आवळे यांनी विविध विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्याचे व पंचायत समिती उपसभापती राजकुमार भोसले यांच्या फंडातून उभारण्यात आलेल्या आठ हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सदस्य प्रवीण जनगोंडा प्रमुख उपस्थित होते.
उपसभापती राजकुमार भोसले म्हणाले, आमदार आवळे यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनाप्रमाणे विकासासाठी तत्काळ निधी दिला. पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी भरीव निधी दिला आहे. पाणंद रस्ते, बिरदेव मंदिर सभागृह, मुस्लिम समाज मशीदसाठी संरक्षक भिंत यासाठी आमदारांनी निधी द्यावा.
यावेळी प्रवीण जनगोंडा, बाळासाहेब भंडारी, सागर पाटील, विलास अनुसे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास बबन ना. भंडारी, नामदेव पाटील, तुकाराम अनुसे, उद्योगपती मदन भंडारी, महावीर पाटील, धनपाल कांबळे, नजीर मुलाणी, अमीर मुलाणी, धनपाल भोरे, भूपाल मगदूम, सिद्धू नरबळ, संजय कुंभार, शिवाजी शेटे, विनोद कदम, मधुकर खोत उपस्थित होते.
बाळासाहेब भंडारी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नरंदे येथे आमदार राजू आवळे यांचा सत्कार मदन भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रवीण जनगोंडा, राजकुमार भोसले, आदी उपस्थित होते.