कणकवली : माजीनारायण राणेंची भूमिका २५ला? मुख्यमंत्री नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असली तरी अद्याप त्यांचा याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २५ एप्रिल रोजी ते आपला निर्णय घेतील, अशी कणकवलीत चर्चा आहे. येथील ओम गणेश बंगल्यावर रविवारी काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांची गुप्त बैठक झाली. या बैठकीतील तपशील समजू शकला नाही, मात्र २५ एप्रिलला नारायण राणे आपला निर्णय जाहीर करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये नाराज असल्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, नारायण राणे यांच्या सर्व मागण्या भाजपकडून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राणे भाजप प्रवेशाचा निर्णय घेत नाहीत, असे समजते. मात्र नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. ते भाजपमध्ये आल्यास भाजपमध्ये पुन्हा दोन गट पडतील व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील महत्त्वाची पदे मिळतील, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांंना वाटत असल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे. मात्र नारायण राणे यांनी आपला ठाम निर्णय अजूनही घेतला नसून ते २५ एप्रिलला निर्णय जाहीर करतील, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)नारायण राणे आले तर आनंदच : चंद्रकांत पाटील सांगली : कॉँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपत येण्याविषयीची चर्चा जाणीवपूर्वक पसरविली गेली आहे. तरीही ते भाजपमध्ये येत असतील, तर आम्हाला आनंद वाटेल, असे मत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी मिरजेत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, नारायण राणेंविषयी कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा पक्षीय पातळीवर झालेली नाही. भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाची चर्चा ही कोणीतरी जाणीवपूर्वक पसरवलेली आहे. यात माध्यमांचाही वाटा अधिक आहे. तरीही राणे आमच्याकडे येत असतील तर स्वागत आहे.
नारायण राणेंची भूमिका २५ला?
By admin | Published: April 23, 2017 11:45 PM