शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अरुंद रस्ता, रोज ७० हजार वाहनांची धाव --असुविधांचा ‘महा’मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:02 AM

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आहे.

ठळक मुद्देकिणी ते कागल : जमिनीचे अधिग्रहण होऊनही सहापदरीकरण रखडलेदेखभालीत हयगय; अपघातांच्या संख्येत वाढ

तानाजी पोवार।कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलपासून किणीपर्यंत सुमारे ४८ किलोमीटर लांबीचा मार्ग सध्या समस्यांचे आगार बनला आहे. या महामार्गावर धावणाऱ्या वाहनांना सध्या रस्त्यांची रुंदी अपुरी पडू लागल्याने हा महामार्ग म्हणजे धोक्याची घंटाच बनला आहे. सुविधांची वानवा, रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे अपघाताच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. रोज किमान ७० हजार वाहनांची ये-जा असूनही सहापदरीकरणाला ‘खो’ बसला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) व नॅशनल हायवे आॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या दोघांच्या वादात हे सहापदरीकरण कोणी करायचे हाच प्रश्न उभा आहे. तोपर्यंत अपघाताची मालिका वाहनधारकांच्या जिवावर बेतत आहे.

संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आहे. महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी अपुरी पडून हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. महामार्गावर ६० हजारांपेक्षा अधिक वाहनांची धाव असेल तर तो सहापदरीकरण असणे बंधनकारक आहे. पण, सध्या ६० हजार वाहनांचा आकडा कधीच पूर्ण झाला आहे.

सहापदरीकरण रस्ता करण्यासाठी सुमारे ६० मीटर जमीन राष्ट्रीय महामार्ग विभागाने यापूर्वीच अधिग्रहण केली आहे; पण सहापदरीकरणाच्या कामाला ग्रहण लागले आहे. टोल वसुली ‘एमएसआरडीसी’कडे अन् सहापदरीकरणाचे काम एनएचएआय यांच्याकडे असा खोळंबा बनला आहे.

महामार्गावर स्वच्छतागृह, बिघडलेल्या वाहनांना दुरुस्तीसाठी साईट पार्किंगची कमतरता, रस्ता दुभाजकांमध्ये गुडघाभर वाढलेले खुरटे गवत, तसेच झाडे गर्द असली तरी त्याची योग्य पद्धतीने कटिंग न करता निगा राखलेली दिसत नाही. रस्त्यावर तुंबलेले अगर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये बसविलेली गटर्सची चॅनल पूर्णपणे कोसळली असून, रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी केलेले नळही मातींनी भरले आहेत. टोल आकारणीतून या सुविधांचे पैसे घेत असले, तरी प्रत्यक्ष सुविधांची वानवाच आहे.

६०,000पेक्षा अधिक वाहनांची दररोज वर्दळ असल्यास सहापदरीकरण बंधनकारककिणी ते कागलपर्यंत४८कि. मी. रस्तारोज किमान ७०हजार वाहनांचीये-जाटोल आकारणीची२०२२पर्यंतची जबाबदारी एमएसआरडीसीकडेसहापदरीकरणासाठी ६०मीटरजमीन पूर्वीच अधिग्रहण२०२२ पर्यंत टोलवसुलीची मुदत (राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत)

टॅग्स :highwayमहामार्गkolhapurकोल्हापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभाग