गडहिंग्लज : धर्म ही व्यक्तिगत बाब आहे, ती घरातच ठेवली पाहिजे. इस्राईल हा एकमेव देश सोडला तर जगातील कोणतेही राष्ट्र धर्माच्या आधारावर टिकलेले नाही आणि टिकणारही नाही. म्हणूनच धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्र सेवा दलाची आज देशाला अधिक गरज आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.येथील साधना हायस्कूलमध्ये आयोजित विविध पुरोगामी सामाजिक संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते.अॅड. शिंदे म्हणाले, देशात जातीयवादी आणि धर्मांध शक्तींनी उचल खाल्ली आहे. त्यांनी घरातील धर्म रस्त्यावर आणला आहे. त्यांना रोखण्याचे धाडस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे.यावेळी सेवा दलाचे माजी महामंत्री भरत लाटकर, विलास किरोते, विलास वकील, प्रा. किसनराव कुराडे, प्राचार्य गंगाराम शिंदे, अॅड. दिग्विजय कुराडे, साताप्पा कांबळे, प्रल्हादसिंह शिलेदार, प्रकाश भोईटे, गणपतराव पाटोळे, उषा किरण पोवार, प्रकाश कांबळे, पांडुरंग करंबळकर, सुनील कुराडे, चंदन माटंगे, शहाजी गोंगाणे, काशीनाथ तनंगे, आप्पासाहेब कमलाकर, बाळासाहेब मुल्ला, बाळेश नाईक , आदी उपस्थित होते. प्राचार्य जे. बी. बार्देस्कर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्ञानराजा चिघळीकर यांनी आभार मानले.‘आपलं घर’साठी ५० हजारकिल्लारीच्या भूकंपानंतर नळदुर्ग येथे राष्ट्र सेवा दलातर्फे चालविण्यात येणाºया ‘आपलं घरं’ या वसतिगृहासाठी गडहिंग्लज येथील सर्व पुरोगामी संघटना व राष्ट्र सेवा दलातर्फे ५० हजारांचा निधी अरविंद बार्देस्कर यांच्या हस्ते भाई सुराणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
धर्मावर राष्ट्र टिकणार नाही : पन्नालाल सुराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:48 AM