राधानगरी : तालुका महसूल विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने राधानगरीत राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला.
ग्राहक संरक्षण कायदा २०२० मधील नवीन तरतुदी व कायद्याद्वारे ग्राहक, व्यापारी आणि उत्पादक या सर्वांना वेगवेगळ्या स्तरावर कसे सरक्षण मिळते, याबाबत प्रमुख वक्ते अजय भोसरेकर (माजी जिल्हा न्याय मंच न्यायाधीश, लातूर) यांनी वेबिनारद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, ग्राहक पंचायतीचे अरुण यादव व संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते.
राधानगरीचे तालुका पुरवठा अधिकारी अनंत घोलकर, अतुल काकडे, सहायक गटविकास अधिकारी शरद शिंदे, बी. बी. कोकाटे, राधानगरी तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, संघटक संतोष हावळ, चंद्रकांत वांजुळे, सूरज माने, सुरेश वडगावकर, दिनकर चौगले व पदाधिकारी उपस्थित होते. विठ्ठल चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संतोष हावळ यांनी आभार मानले.