लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा :
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग व कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांच्या वतीने ‘कंटेम्परी प्रॅक्टिसेस इन आर्किटेक्चर’ या चार दिवसांच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १८ ते गुरुवार, दि. २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या चार दिवसीय कार्यशाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
शिक्षकांच्या कौशल्याचा विकास व्हावा व त्यांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सकारात्मक प्रभाव पडावा, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करावा यासाठी या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेसाठी आर्की. रफिक आझम (बांगलादेश), हबीब खान, अभय पुरोहित (नागपूर), निळकंठ छाया, राजीव कटपालिया, यतीन पंड्या, अनिकेत भागवत (सर्व अहमदाबाद), डीन डी क्रूझ (गोवा), मनीष बँकर (पुणे), चंपक राजगोपाल, चित्रा विश्वनाथ (बेंगळुरू), शिरीष बेरी व सुनील पाटील (कोल्हापूर) आदी देश-विदेशातील नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार असून, विविध राज्यातील शिक्षक सहभागी होणार आहेत. तरी इच्छुक शिक्षकांनी सहभागासाठी विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेसाठी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, वास्तुशास्त्र विभाग अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव, प्रो. मधुगंधा मिठारी व सर्व प्राध्यापक वर्ग यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभणार आहे.