कोल्हापूर : ‘डिजिटल लर्निंग’ या मासिकाच्या सर्वेक्षणानुसार कोल्हापुरातील विबग्योर (सीबीएसई बोर्ड) स्कूल २०१४ मध्ये शैक्षणिक क्षेत्रात उच्चत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणारी अव्वल स्कूल ठरून राष्ट्रीय मानांकन मिळविले. दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात स्कूलचे संस्थापक रूस्तम केरावाला व मुख्याध्यापक टी. बालन यांना त्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यापूर्वीही एज्युकेशन वर्ल्ड इंडिया आणि सेंटर फॉर फोरकास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली यांचा ‘सीबीएसई सर्वोत्तम शाळेचा’ पुरस्कार विबग्योर स्कूलने सलग दोन वर्षे मिळविला होता. (वा.प्र )
‘विबग्योर’ स्कूलला राष्ट्रीय मानांकन
By admin | Published: February 05, 2015 12:02 AM