आजरा : आजरा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ‘भारतातील आर्थिक विकासातील पुनर्भरण’ या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन उद्या, शुक्रवारी व शनिवारी (दि. ३१) आयोजित केले आहे.इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहयोगाने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. उद्घाटन धारवाड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एल. डी. वैकुंठे यांच्या हस्ते, तर यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास केंद्राचे संचालक डॉ. व्ही. बी. जुगळे यांच्या उपस्थितीत व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. चर्चासत्राचा समारोप डॉ. डी. सी. तळुले व डॉ. अनिल देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या चर्चासत्रामध्ये डॉ. ए. ए. डांगे, डॉ. व्ही. बी. ककडे, डॉ. सबन्ना तलवार, आदी मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी आपले शोधनिबंध समन्वयक डॉ. एस. के. चव्हाण, आजरा महाविद्यालय आजरा या पत्त्यावर पाठवावे व चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
अर्थशास्त्रचे आजऱ्यात आजपासून राष्ट्रीय चर्चासत्र
By admin | Published: January 29, 2015 11:58 PM