शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

राष्ट्रवादीत वैर, काँग्रेस सैरभैर

By admin | Published: July 25, 2014 10:21 PM

कुठलीही सत्ता आपल्या हातात कायम राहील, असा गर्व कोणी करू नये.

कुठलीही सत्ता आपल्या हातात कायम राहील, असा गर्व कोणी करू नये. खरं तर आजवरच्या राजकीय वाटचालीकडे पाहिलं तर हे स्पष्ट दिसतं. तरीही त्यापासून धडे घेतले जात नाहीत. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित आणि धक्कादायक निकालांनंतर आता विधानसभा जवळ येत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय चित्र काहीसं असंच दिसत आहे. राष्ट्रवादीतील वैर मिटण्याची कसलीच चिन्हं नाहीत. उलट दिवसागणिक कसल्या ना कसल्या हालचालींमधून ते वाढतच आहे, तर काँग्रेसची अवस्था सैरभैर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा धक्का पचण्याआधीच काँग्रेसला नारायण राणे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे मुळातच कमी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ वाढत चालली आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा इतक्या मोठ्या फरकाने पराभव होईल, याची कल्पना विनायक राऊत यांनाही नसावी. आकडेवारी कोणीही, कितीही सांगितली, तरी इतका फरक कोणालाच अपेक्षित नव्हता. या पराभवामुळे राजकीय स्तरावर अनेक बदल झाले आहेत. जिल्हास्तरावरही हे बदल मोठ्या प्रमाणात आणि स्पष्ट दिसत आहेत.शिवसेना - भाजपा युती रत्नागिरी जिल्ह्यात मुळातच बळकट आहे. १९९५पासून रत्नागिरी जिल्ह्यावर युतीने विशेषत: शिवसेनेने आपली पकड मजबूत ठेवली आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र चूल मांडली. काँग्रेसची मते विभागली गेली. त्यामुळे युतीचा मार्ग अधिकच मोकळा झाला. २00४ रत्नागिरीत उदय सामंत आणि चिपळुणात रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला खाते उघडून दिले. अर्थात तरीही जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समित्यांवर युतीचेच वर्चस्व होते. त्यानंतरच्या काळात राजापूर आणि संगमेश्वर-लांजा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. शिवसेनेचे मावळते आमदार काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. १९९५पासून जिल्ह्यात काँग्रेसला आमदारकी नव्हती. ती गणपत कदम आणि सुभाष बने यांच्या रूपात मिळाली. पण, त्यानंतर झालेल्या २00९च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मात्र गणपत कदम पराभूत झाले आणि मतदारसंघ विलिनीकरणात सुभाष बने यांना निवडणुकीपासून लांब राहावे लागले. त्यामुळे २00९च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यात काहीच आले नाही.तळागाळातील युतीची ताकद आधीपासूनच चांगली आहे. आता त्यात लोकसभेत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राज्यात शिवसेनेनेचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला अधिक उत्साहाने सामोरे जाण्याचा आत्मविश्वास या कार्यकर्त्यांमध्ये आला आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था गंभीर आहे.राष्ट्रवादीने रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची आणि त्याचबरोबर मंत्रिपदाची माळ सलग तीनवेळा निवडून आलेल्या उदय सामंत यांच्या गळ्यात टाकण्याऐवजी रामदास कदम यांना पराभूत करून प्रथमच राष्ट्रवादीचे आमदार झालेल्या भास्कर जाधव यांच्या गळ्यात टाकली. तेथून ठिणगी पेटली. भास्कर जाधव विरूद्ध उदय सामंत असं वातावरण रंगू लागली. कोकणावर विशेषत: रायगड आणि रत्नागिरीत वर्चस्व अपेक्षित असलेल्या सुनील तटकरे यांनी भास्कर जाधव यांचा वेग पाहून उदय सामंत यांना जवळच केले. (त्याआधीच्या राजकारणात उदय सामंत यांच्याशी न पटणाऱ्या उमेश शेट्ये आणि नाना मयेकर यांच्याशी सुनील तटकरे यांचे सख्य होते.) भास्कर जाधव यांचे पक्षातील वजन वाढू लागल्याने उदय सामंत, त्यांचे समर्थक सहकारी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यातील अस्वस्थपण वाढू लागला. ही अस्वस्थता हेरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छोट्याशा निमित्ताने भास्कर जाधव यांच्याकडील मंत्रिपद काढून उदय सामंत यांच्याकडे सोपवले. सामंत यांच्या गोटामध्ये मंत्रिपद मिळाल्याचा आणि भास्कर जाधव यांचे मंत्रिपद गेल्याचा दुहेरी आनंद साजरा झाला. पण, अक्षरश: पुढच्याच दिवशी भास्कर जाधव यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या मतदार संघातही तटकरे यांच्यासाठी करिश्मा झाला नाही. (किंवा केला गेला नाही.) त्यानंतरची घडामोड म्हणून भास्कर जाधव यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आले आणि सुनील तटकरे यांचे त्या पदावर पुनर्वसन झाले, तर भास्कर जाधव यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन झाले. भास्कर जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतून वगळलेल्या खेडच्या बाबाजी जाधव यांना सन्मानाने कार्यकारिणीत घेतले. भास्कर जाधव यांचे कट्टर विरोधक आणि खुद्द तटकरे यांच्याच विरोधात लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या रमेश कदम यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. या साऱ्या घटना पाहता राष्ट्रवादीतील वैर न थांबता वाढतच असल्याचे दिसत आहे. येत्या विधानसभेत आपल्या वर्चस्वासाठी दुसऱ्याला पाडण्याचा प्रकार होणार, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील ही वैर भावना राष्ट्रवादीच्याच पराभवाला कारणीभूत ठरणार आहे.एकीकडे राष्ट्रवादीत वैर आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सैरभैर आहे. एकेकाळी जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार काँग्रेसचे असायचे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था सगळीकडे काँग्रेसचे स्थान मजबूत होते. पण, तो आता इतिहास झाला आहे. आताच्या घडीला जिल्हा परिषदेत ५७ जागांपैकी केवळ ३ जागा काँग्रेसकडे आहेत. पंचायत समित्यांच्या ११४ जागांपैकी केवळ ८ इतक्याच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. एकही आमदार काँग्रेसचा नाही. खासदारकीची एकमेव जागा काँग्रेस दिमाखात मिरवत होते. पण, आता काँग्रेसकडे ती जागाही नाही. त्यात झालेल्या पराभवामुळे उरल्या-सुरल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचाही धीर खचला आहे.जिल्ह्यात त्यातल्या त्यात काँग्रेस वरचढ आहे ती राजापुरात. पण, तेथे उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, हे मोठे कोडे आहे. तेथे ताकद असल्याने इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साहजिकच तेथे नाराजांची संख्या वाढणार, हेही खरे आहे. आताशा कोणी पक्षासाठी, धोरणासाठी राजकारणात जात नाही. साऱ्यांचे लक्ष स्वत:ला मिळणाऱ्या पदाकडेच असते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राजापुरात उमेदवारी एकाला दिल्यानंतर आठ-नऊ उमेदवार, त्यांच्या आसपास घोटाळणारे, पक्षापेक्षा त्यांच्यावरच निष्ठा असणारे लोक नाराज होणार, हे नक्की आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणारी काँग्रेस सैरभैर आहे, हे स्पष्ट दिसत आहे.आता गणपत कदम आणि सुभाष बने यांनीही काँग्रेसला रामराम करण्याचा विचार सुरू केला आहे. गेल्या काही काळात नारायण राणे यांना पक्षात दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याने कदम-बने यांचीही काँग्रेसमध्ये घुसमट होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. ते अलिकडेच काँग्रेसमध्ये आले होते. ते काँग्रेसमध्ये दाखल होण्याआधीही काँग्रेस कार्यरत होतीच. पण, तरीही त्यांच्या जाण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम होईल. काँग्रेसच्यादृष्टीने त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच झाली आहे की राजापूरच्या माजी नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली आहे. मात्र काँग्रेस सध्या इतकी दुबळी झाली आहे की एवढ्याशा मलमपट्टीने पूर्ण जिल्ह्यातील परिस्थिती सुधारणा नाही.या एकूणच राजकीय वातावरणात काँग्रेसची सैरभैर वाढणार आहे. त्यामुळे नजीकच्या काही महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात मोठे राजकीय परिवर्तन पाहायला मिळणार, हे नक्की.