शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

नववर्षाच्या सुरुवातीलाच रेशन दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत बंद, कोल्हापूर जिल्ह्यातील १६७० दुकानदार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 5:39 PM

प्रलंबित मागण्यांसाठी निकराचा लढा

कोल्हापूर : धान्यावरील कमिशनमध्ये वाढ, स्वस्त धान्य दुकानदारांना आरोग्य सुविधा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी साेमवारपासून (१ जानेवारी) रेशन दुकानदारांनी देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ६७० दुकानदार सहभागी होत असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे सचिव चंद्रकांत यादव व काेल्हापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवर कुटुंबाचा खर्च भागत नाही. महागाईचा उच्चांक असताना अनेक वर्षे मागणी करूनही शासनाने कमिशन वाढविलेले नाही. कोरोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून दुकानदारांनी नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविले, काहीजणांचा मृत्यू झाला तरी शासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होऊन दुकानदारांना मनस्तापाला सामोरे जावे लागते.

केरोसीन व्यवसाय बंद केल्याने ५५ हजारांवर व्यावसायिक रस्त्यावर आले. यापैकी कोणत्याही विषयात शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांची दखल घेतली नाही. देशपातळीवर झालेल्या संघटनेच्या निर्णयानुसार सोमवारपासून दुकाने बेमुदत बंद राहतील व १६ जानेवारीला रामलीला मैदान ते संसद भवनपर्यंत जाऊन पंतप्रधानांना निवेदन दिले जाईल.

यावेळी दीपक शिराळे, करवीर अध्यक्ष संदीप पाटील, नामदेव गावडे, गजानन हवालदार, राजेश मंडलिक, सुनील दावणे, सुरेश पाटील, नयन पाटील, सागर मेढे, श्रीपती पाटील, संदीप लाटकर,साताप्पा शेणवी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर