२०१९ ला आलेल्या महाप्रलयकारी महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केले असून त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि.१५) रोजी दुपारी गारगोटी येथील वेदगंगा नदीच्या दत्तघाटावर तहसीलदार अडसूळ यांनी यावेळी लाइफ बोटच्या प्रात्यक्षिक स्वतः बसून घेतले.
यावेळी त्या म्हणाल्या, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आम्ही सगळी तयारी करून ठेवली असून तालुकवासीयांना काही अडचणी आल्यास भुदरगड तहसील किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.
प्रत्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ, मंडल अधिकारी लांब , तलाठी राजन शिंदे, एफ. आय. भटारे, संतोष पाटील, रेस्क्यू टीमचे राहुल कारंडे, बसवराज विटेकरी, स्मिता दिंडे, श्रेया शिंदे, सोनाली केसरकर, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, ग्रा. पं. सदस्य जयंवत गोरे यासह आपत्ती व्यवस्थापनाचे पंधरा जवान या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते.