शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 5:16 PM

CoronaVirus Kolhapur : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांनी जणू काही जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले.

ठळक मुद्देकोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरुपकोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांनी जणू काही जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले.संपूर्ण महाराष्ट्रात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाईरोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागलचौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जीवंतपणा आला. नागरीकांच्या झुंडी रस्त्यावरुन जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांनी रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका चौकात असणारे सिग्नल सुध्दा दीड महिन्यांनी प्रथमच सुरु झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर