शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कोल्हापुरात बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:28 AM

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडून कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात होताच सोमवारी कोल्हापूर शहरातील अवघा जनसागर रस्त्यावर अवतरला. गेल्या दीड महिन्यापासून ओस पडलेले रस्ते वाहने, माणसांनी फुलले. त्यामुळे रस्ते, बाजारपेठा यांना जणू काही जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

संपूर्ण महाराष्ट्रात आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलॉकचे जे पाच टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यातील चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तरीही सोमवारपासून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा ऐवजी आता दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला हा मोठा दिलासा आहे.

गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण शहराला एक प्रकारची मरगळ आली होती. कडक निर्बंध, लॉकडाऊन यामुळे जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला होता. कुठे जाण्यावर, स्वैरपणे हिंडण्यावर, पहाटेच्या प्रसन्न वातावरणात मनसोक्त चालण्यावर , बाजारपेठेत खरेदी करण्यावर बंधने आली होती. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सोमवारी ही बंधने शिथिल झाली.

त्यामुळे शहरातील महाद्वार, ताराबाई रोड, भाऊसिंगची रोड, लक्ष्मीपुरी, गंगावेश, बागल चौक, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, कोळेकर तिकटी, कसबा बावडा, ताराबाई पार्क, मार्केट यार्ड परिसरातील गर्दीने शहराला जिवंतपणा आला. नागरिकांच्या झुंडी रस्त्यावरून जाताना दिसत होत्या. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने नोकरीवर जाणाऱ्यांची जशी लगबग होती, तशी भाजीपाला, जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठीही झुंबड उडाली होती.

दुचाकी, तीन चाकी तसेच चार चाकी वाहनांची रस्त्यावर गर्दी झाली होती. त्यामुळे सर्वच रस्त्यावर वाहनांचा रांगा आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. शहरातील चौका-चौकांत असणारे सिग्नलसुद्धा दीड महिन्यांनी प्रथमच सुरू झाले. गर्दीवर, वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण मिळविताना पाेलिसांना बरेच प्रयत्न करावे लागत होते.

सलून, पार्लरनी धूळ झटकली-

पंधरा एप्रिलपासून शहरातील सर्व सलून, पार्लर बंद होती. हातावर पोट असलेल्या सलून व पार्लर मालक व कारागिरांनी संकटात आर्थिक टंचाईचे चटके सोसले. आपले व्यवसाय कधी सुरू होणार याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली होती. सोमवारपासून पन्नास टक्के आसन क्षमतेवरच व्यवसाय करण्याची त्यांना परवानगी देण्यात आल्याने या व्यावसायिकांनी धूळ झटकत बऱ्याच दिवसांनी कामाचा श्रीगणेशा केला.

फेरीवाल्यांचा उत्साह -

लॉकडाऊनचे कडक निर्बंध केले होते, तेव्हा केवळ भाजी व फळ विक्रेते यांनाच सकाळी सात ते अकरा यावेळेत व्यवसाय करण्याची मुभा होती. आता ही वेळ चार वाजेपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला आहे. परंतु महाद्वार रोडवर सोमवारी तयार कपडे, चपला, छत्र्या, रेनकोट, चहा, खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले स्टॉल लावल्याचे दिसून आले.

त्यांनी घेतला मोकळा श्वास-

पहाटेच्या रम्य वातावरणात अनेक शहरवासीयांना फिरण्याची सवय आहे. चालण्याच्या व्यायामातून निरोगी राहण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. परंतु, कोरोना संसर्गामुळे या प्रयत्नांवर बंधने आली होती. कोणी फिरायला बाहेर पडलाच तर पाचशे रुपयांचा दंड होत असे. परंतु, सोमवारी बंधने शिथिल झाल्यामुळे अनेकांनी फिरण्याची मौज लुटली.

दुकाने मात्र बंदच-

शहरातील कपडे, भांडी, सराफ दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, चपलांची दुकाने, कटलरी दुकाने अद्यापही बंदच राहणार आहेत. हॉटेलचालकांना पार्सलची सुविधा देण्यास मुभा आहे. त्यामुळे हे व्यवसाय सोमवारीही बंद राहिले.

-चारनंतर पुन्हा बंद -

दुपारी चार वाजताच महापालिकेची पथके, पोलिसांची पथके यांनी शहराच्या विविध भागात फिरून व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे दिवसभर फुललेले रस्ते पुन्हा ओस झाले.