कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय स्थानिक फळे, फळभाज्या व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्ग मित्र संस्थेतर्फे ‘पपनस’ (बंपर) या लुप्त होत चाललेल्या वृक्षाचा शोध आणि संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत रोपांचीही उपलब्धता करून देण्यात येणार आहे.
पपनस (बंपर) हा आपल्या परिसरात काही वर्षांपूर्वी सहज उपलब्ध असणारा; परंतु हल्ली विस्मरणात गेलेल्या लिंबू, संत्री, मोसंबी, इत्यादी सिटारस वर्गातील अत्यंत आरोग्यकारी आणि बहुगुणी वृक्ष आहे. याचा शोध घेऊन त्याचे संवर्धन व्हावे यासाठी निसर्गमित्र संस्था सरसावली असून, त्यांनी विविध कृतिशील उपक्रमांचे आयोजन केले आहे.
संस्थेमार्फत पपनसाचे वृक्ष ज्यांच्या शेतात, परसबागेत परिसरात आहेत त्यांची नोंद करण्यात येणार आहे. तसेच संस्थेने तयार केलेल्या पपनस वृक्षांची रोपे पूर्व नोंदणी करून लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय पपनसची लागवड तसेच या फळाचे औषधी गुणधर्म, आरोग्यविषयक महत्त्व, पपनसाचा आहारातील उपयोग याविषयी रविवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ४:३० वाजता गुगल मीटच्या माध्यमातून वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत तर या पपनस फळाच्या विविध पाककृतीबाबत राणिता अनिल चौगुले मार्गदर्शन करणार आहे.
कोट
पपनस (बंपर) हे आपल्या परिसरात काही वर्षांपूर्वी सहज उपलब्ध असणारे फळ होते. आता ते लुप्त झाले आहे. त्याचा शोध घेण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यासाठी ज्यांना ज्यांना या फळाविषयी माहिती आहे, ज्यांच्याकडे हे फळ उपलब्ध आहे, त्यांनी अतिशय उपयुक्त अशा या वृक्षाच्या संवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे.
-अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र
महालक्ष्मीनगर, कोल्हापूर
----------------------------------------------
(बातमीदार : संदीप आडनाईक)
फोटो : 31082021-kol- papnas-bumpe tree
फोटो ओळी : बहुगुणी पपनस उर्फ बंपर वृक्ष.
फोटो : 31082021-kol- papnas-bumper
फोटो ओळ : पपनस ऊर्फ बंपरची फळे.
310821\31kol_1_31082021_5.jpg~310821\31kol_2_31082021_5.jpg
31082021-kol- papnas-bumpe treer.jpg~31082021-kol- papnas-bumper.jpg