कोल्हापूर : उन्हाळ्यामध्ये अनेक पक्षांचा पाण्याविना जीव जातो आहे यावर उपाय म्हणून वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेकडून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महावीर उद्यानात झालेल्या या कार्यशाळेत तरुणासह लहान मुलांनीही सहभाग घेतला.सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील अमुलाग्र बदलामुळे यंदाचा उन्हाळा हा अतिशय तीव्रतेने जाणवू लागला आहे याच्या झळा जशा माणसाला बसत आहेत त्याचप्रमाणे वन्य जीव पशुपक्षी यांनाही अतिशय त्रास जाणवतो.
पक्षी हा निसर्ग रचनेतील एक अविभाज्य आणि मूलभूत घटक आहे निसर्ग साखळी अभेद्य राहण्यासाठी पक्षी कीटक यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे असते कारण सर्वात जास्त वृक्षारोपणाचे आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे काम हे पक्षीच करतात परंतु सध्या मानवी चुकांमुळे आणि अतिक्रमणांमुळे पक्षी नामशेष होतील की काय अशी भीती निर्माण झालेली आहे कारण माणसाने पक्षांचा जास्तीत जास्त वावर असलेले पाणवठे तसेच नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण केलेले आहे म्हणून पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये म्हणून जल पात्र तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी असंख्य रंग बिरंगी जलपात्र तयार केली.इथून पुढे विविध सामाजिक संस्था, लहान मुले, शाळा, महाविद्यालये यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची जलपात्र निर्मिती करून घेऊन नाममात्र किमतीमध्ये सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करण्याचे काम वृक्ष प्रेमी संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. या जलपात्र निर्मिती कार्यशाळेचे प्रकल्प अधिकारी म्हणून सर्पमित्र अक्षय कांबळे यांनी काम पाहिलेयावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य सतीश कोरडे, परितोष उरकुडे,नितिन डोईफोड़े, साजिद शेख, विशाल पाटील,अमर पोवार, शिवम जाधव, अभिजित गडकरी, शुभम सलोखे,सौ सविता साळोखे ,सौ विद्या पाथरे,अर्चना कुलकर्णी,अर्पिता राऊत, नेहा पाटिल,श्रेय चौगुले, आंचन कत्यारे, विकास कोंडेकर, प्रमोद गुरव, शैलेश पोवार, सचिन पोवार, शैलेश टिकार,लव बकरे यांनी सहभाग घेतला.