शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

निसर्गवेडा चित्रकार- कोल्हापूर स्कूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:02 AM

खरं म्हणजे कलापूरच्या चित्रशिल्प पंरपरेचा इतिहास आणि वारस्याबद्दल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीयुत शामकांत जाधव जे अद्यापही कुंचले आणि लेखनी यामध्ये आनंदी व मग्न आहेत. त्यांनी एका विशिष्ट शब्दशैलीमध्ये या चित्र-शिल्प परंपरेचे रेखाटन ‘रंग

- शिवशाहीर डॉ. राजू राऊत

खरं म्हणजे कलापूरच्या चित्रशिल्प पंरपरेचा इतिहास आणि वारस्याबद्दल कोल्हापूरचे सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीयुत शामकांत जाधव जे अद्यापही कुंचले आणि लेखनी यामध्ये आनंदी व मग्न आहेत. त्यांनी एका विशिष्ट शब्दशैलीमध्ये या चित्र-शिल्प परंपरेचे रेखाटन ‘रंग चित्रकारांचे’ या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले आहे. ते एका अर्थाने कोल्हापूरचे कलाक्षेत्रातील गॅजेटच म्हणावे लागेल.

काही ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून त्यांनी केलेल्या कलाकाराचे जे मूल्यमापन आहे त्याला वेगळ्या कुठल्या पद्धतीने परत तिच ओळख करून देणे म्हणजे एक अवघडच काम आहे. त्यांचे वैयक्तिक आकलन, त्यांची शब्द संपत्ती, त्यांचे त्या कलाकाराशी असलेले नाते, पाहिलेली त्यांची हजारो चित्रे व हरएक चित्रकाराच्या निर्मितीवर त्यांच्या अनेक प्रज्ञावंत सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून, उहापोहातून त्या प्रत्येक चित्रकाराची ओळख त्यांनी अशी काही करून दिली आहे की, त्या ओळखीशिवाय त्या चित्रकाराची दुसºया पद्धतीने ओळख करून देणे हे केवळ अशक्य आहे.

आणि अगदी नेमकी हीच गोष्ट तंतोतंत निसर्गप्रेमी चित्रकार श्रीयुत ए. टी. पाटील सर यांच्याविषयी आहे.‘आकाश आणि जमीन ही या चित्रकाराची श्रद्धास्थाने!. म्हणून त्यांच्या चित्रांमध्ये पुरोभूमी आणि पार्श्वभूमी समृद्ध आविष्कारांनी नटलेली पाहायला मिळते. त्यांच्या चित्रातलं आकाश विविध भावाविष्कारांनी फळाला आलेलं दिसतं. जमीन तर अनेक रंगाविभ्रमाचा खजिना. तिचे पोत रसिकतेची द्वारं उघडणारे.’

वरील त्यांच्याच शब्दातील वर्णनाप्रमाणे तंतोतंत ए. टी. पाटील सर यांच्या चित्रजीवन शैलीतील प्रवास दिसून येतो. हजारो निसर्गदृश्यांची निर्मिती करीत कोल्हापूर ते दिल्ली भारतातील अनेक गावांमध्ये अनेक चित्र प्रदर्शन पार पाडणारे उदा. मुंबई, पुणे, वाराणसी, दिल्ली या शहरांमधून आपल्या अंगी असणाºया चित्रशिल्पातून जिवंत लसलसत्या ओल्यागार निसर्गाचे एक वेगळं रूप त्यांनी जगापुढे आणलं. डोंगर, पठार, जलाशय, आकाश, कुंपणं, झाडंझुडपं, बागा, समुद्र, सूर्यास्त,चंद्रोदय, घरं, माणसं या सर्वांचा वावर त्यांच्या चित्रात प्रामुख्याने आढळतो. आकारांच्या बांधणीतून आणि रंगाच्या स्पर्श किमयेतून त्यांची अशी चित्रे अवतरत.

अनेक पौरात्त्य व पाश्चिमात्य चित्रकारांच्या प्रभावासहित थेट आबालालपर्यंतच्या प्रभावातून त्यांच्या जीवनजाणिवा, मूल्ये, प्रेरणा यांची जडणघडण झाली होती. आणि ती इतकी घट्ट आणि बळकट होती की, स्वत: ए. टी. पाटील सर प्रकृतीने मृदू आणि मितभाषी असले तरी या चित्रकारांच्या चित्रांचा परिणाम हा कॅनव्हासवर अतिशय ठळक आणि ठसठसीत असायचा. त्यांच्या कॅनव्हासलाही विशिष्ट अशा आकारांची मर्यादा कधीच नव्हती. कधी चौरस, कधी लंबचौकोन, कधी उभट, लांबट, नानाविध प्रकारच्या आकारमानात समोरच्या निसर्गाला ते अगदी लिलया ‘कंपोज’ करीत गेले आणि भारतीय चित्रकारांच्या मालिकेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार म्हणून ते मानांकित झालेच, शिवाय हजारो चित्रांची निर्मिती करीत त्यांचे अनेक विद्यार्थी आज नावारूपाला येऊन त्यांचे विषय, त्यांची शैली, त्यांची परंपरा थोडक्यात जातकुळी सांगत अभिमानाने मिरवत आहेत.

खरं तर कोणी एके काळी देव-देवता, ऐतिहासिक पुरुष यांच्या चित्रांच्या मागे बॅकग्राऊंड म्हणून किंवा एखाद्या पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक प्रसंगाच्या मागे स्थळमहिमा सांगण्यासाठी, लोकेशन दाखविण्यासाठी उपयोगात येणारी ही निसर्ग चित्ररेखाटन कला पाश्चिमात्य लोकांच्याकडून दीड-पावणे दोनशे वर्षांपूर्वी भारतात रुजली. त्या काळापासून अनेक प्रतिभावान चित्रकारांनी ती आपलीशी करीत आपल्या ठायी असणाºया यथामती, यथाशक्ती कौशल्याने तिच्यावर संस्करण करीत या निसर्गचित्र रेखाटन कलेला बहर आणला,खुलवली, रसिकांच्यापुढे प्रांजलपणे मांडली. कोल्हापूरच्या तर आबालाल यांनीे अवघे आयुष्यभर हा वसा मिरवला. कदाचित, त्यांचे बलस्थान हा कोल्हापूर आणि कोल्हापूर भागातील अत्यंत देखणा असा निसर्गच होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्यांनी घालून दिलेल्या

या समृद्ध अशा वाटेवरूनच वाटचाल करीत श्रीयुत ए. टी. पाटील सर हे अतिशय तरल मनाने या भावविश्वाशी सलगीचे नाते जोडत. तसेच कोल्हापूरच्याकला परंपरेशी निगडित निसर्गचित्र या कला प्रकारात त्यांनी वेगळी अशी ओळख करून ठेवली आहे.

 

kollokmatpratisad@gmail.com