शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आजऱ्यात आजपासून नाट्यमहोत्सव

By admin | Published: January 08, 2015 12:17 AM

‘नवनाट्य’चे संयोजन : नामांकित सात नाट्यसंघाचा सहभाग

आजरा : आजऱ्याचे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील नवनाट्य मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवास उद्या, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. नाट्यचळवळीची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या आजऱ्यात प्रथमच होणाऱ्या या महोत्सवात कौटुंबिक, सामाजिक, समांतर रंगभूमी या नाट्यप्रकारांचा समावेश असून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित सात हौशी नाट्यसंस्था सहभागी झाल्या आहेत.उद्या सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ सिनेअभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते आणि नवनाट्य मंडळाचे अध्यक्ष अशोक चराटी यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे उद्घाटन होईल. सर्वोत्कृष्ट तीन नाटकांची निवड प्रेक्षकांच्या पसंतीने होणार आहे. दररोज सायंकाळी ठिक ७ वाजता आजरा हायस्कूलच्या खुल्या रंगमंचावर हे नाट्यप्रयोग होतील. विजेत्या संघाचा कै. रमेश टोपले स्मृतिचषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.गोकुळ दूध संघ, आण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सूतगिरणी, आजरा साखर कारखाना, रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटी, आजरा अर्बन बँक, मिनर्वा ग्रुप आजरा व विजयकुमार पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर हे या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.संपूर्ण महोत्सवासाठी ५०० रुपयांची प्रवेशिका, तर दैनंदिन प्रवेशिकेसाठी १०० रुपये शुल्क ठेवले आहे. नाट्यमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. सुधीर मुंज, आय. के. पाटील, भैया टोपले, शरद टोपले, डॉ. अंजनी देशपांडे, नवनाट्य मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)महोत्सवात सहभागी नाटके व संस्था गुरुवार, दि.८ - शांतता कोर्ट चालू आहे (समाराधना, सोलापूर), शुक्रवार, दि.९, सुखांशी भांडतो आम्ही (सिद्धांत, कुडाळ), शनिवार, दि.१०- लोककथा ७८ (संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ), रविवार, दि.११- नटसम्राट (सुगुन, कोल्हापूर), सोमवार, दि.१२ - आर्य चाणक्य (अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर, सांगली), मंगळवार, दि.१३ - तर्पण (अखिल भारतीय नाट्य परिषद, सांगली), बुधवार, दि.१४-लेकरे उदंड जाहली (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ). आजऱ्याच्या नाट्यचळवळीला सुमारे १०० वर्षांची परंपरा आहे. १९६२ मध्ये स्थापन झालेल्या नवनाट्य मंडळाने ही परंपरा पुढे चालविली आहे. नाटकांना प्रादेशिकसह राज्य पातळीवरील पुरस्कारदेखील मिळाले, तर दिवंगत दाजी टोपले सरांना अभिनय व दिग्दर्शनाचा राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या नाट्यमहोत्सवामुळे आजऱ्याच्या नाट्यचळवळीला नवी ऊर्जा मिळेल. - प्रा. सुधीर मुंज, अध्यक्ष, संयोजन समिती, आजरा.