जोतिबा : श्री जोतिबा मंदिरातील दक्षिण महाद्वारावरील नगाराखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एका भाविकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दोन लाख रुपयांची देणगी सिंधिया देवस्थान ट्रस्टकडे दिली. देणगीमुळे आता नगारखान्याला झळाळी प्राप्त होणार आहे.जोतिबा मंदिरात वास्तुकलेचा उत्कष्ट नमुना असलेला पुरातन असा नगारखाना आहे. यामध्ये दररोज पाच वेळा नगारा वाजविला जातो. मंदिरातील नित्य धार्मिक कार्यक्रमावेळी हा नगारा वाजविला जातो. मंदिराच्या दक्षिण दरवाजावर असणारा हा नगारखाना सध्या मात्र दुरवस्थ्ोत आहे. शिल्पकला व नक्षीकाम पुसट झाल आहे. या नगारखान्यातील वाढलेले गवात पाहून एका भाविकांनेच दोन लाख रुपयांची देणगी देऊन याला गतवैभव प्राप्त करून देण्याची इच्छा व्यक्त केली. जोतिबा मंदिरातील सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे व्यवस्थापक मेजर आर. सी. कदम यांच्याकडे दोन लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. नगारखाना नूतनीकरण कामाचा प्रारंभ श्रींचे मुख्य पुजाऱ्यांचे हस्ते करण्यात आले. कदम यांनी चैत्र यात्रेपूर्वी काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
नगारखान्याला मिळणार नव्याने झळाळी
By admin | Published: February 11, 2016 10:38 PM