कोल्हापूर -चांगभलंच्या गजरात जोतिबाचा पहिला पालखी सोहळा धार्मिक उत्साहात पार पडला. खंडेनवमीला दीवे ओवाळणी, शस्त्र पूजन' घट उठविणेचे विधी झाले. जोतिबा डोंगरावर पहाटे 4 वाजता महिलांनी मंदिरातील सर्व देत देवतांना दीवे ओवाळून दर्शन घेतले . खंडे नवमी निमित्त जोतिबाची श्री. कृष्ण रूपात महापूजा बांधली. मंदिरात शस्त्र पूजन केले .सकाळी ८ वाजता उंट, घोडे 'श्रीचे पुजारी' देव सेवक वाजंत्री 'पोलीस बॅन्ड लवाजमा सह पहिला पालखी सोहळा निघाला. चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण झाली. तोफेची सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.
धुपारती सोहळ्याने यमाई, तुकाई भावकाई. जोतिबा मंदिरातील घट उठवण्याचा विधी झाला. कर्पुरश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्यात आला. सुवासिनीनी पायावर पाणी औक्षण करुन धुपारतीचे स्वागत केले. जागोजागी सुगंधी दुध वाटप केले. दुपारी १ वाजता तोफेची सलामी देवून अंगारा वाटप केला. धुपारती समवेत देवस्थान समिती चे प्रभारी महादेव दिंडे सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर .टी. कदम , सरपंच रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दाद र्णे . नवरात्र उपासक गांवकर पुजारी वर्ग सहभागी होता .नवरात्र उपवासांची सांगता झाली .