शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

Navratri 2024: घटस्थापनेने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या दिवशी देवीची सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रुपात पूजा 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 03, 2024 4:22 PM

आदिशक्तीचा जागर सुरू : मंदिर भाविकांनी फुलले

कोल्हापूर : काकड आरती, अभिषेक, घटस्थापना, तोफेची सलामी, सालंकृत मनोहारी पूजा अशा धार्मिक विधींनी गुरुवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. यादिवशी देवीचे महिषासुराशी युद्ध सुरु झाले त्याचे प्रतिक म्हणून पूजेचे घट बसवले जातात, म्हणून या दिवशी अंबाबाईची बैठ्या रुपात पूजा बांधली जाते. त्यानिमित्त देवीची सिंहासनाधिष्ठित अंबाबाई रुपात पूजा बांधण्यात आली. आदिशक्तीच्या जागरासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेले.गुरुवारी पहाटे काकड आरती झाल्यानंतर देवीचा अभिषेक झाला. सकाळी साडे आठ वाजता मुनिश्वर घराण्यातील परंपरागत पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने देवीचे घट बसले आणि अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी शासकीय अभिषेक केला.

श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजादुपारी साडे बाराच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीसुक्तामध्ये वर्णन केलेल्या स्वरुपात बैठी पूजा बांधली आहे. अंबाबाई ही आदिजननी आहे. तिने आपल्या तपोबळावर बिल्ववृक्ष निर्माण केला ज्याची फळे तिला प्रिय आहेत. तिने सृष्टी निर्माण केली. सर्वांना धन, धान्य, पशु, पुत्र, कन्या,, पाणी, खत, फळे, फुले, निर्मितीची, सृजनाची क्षमता असेल असे सर्वकाही दिले. श्रीसुक्तामधील अंबाबाई ही हत्ती घोडे, गाईसारख्या पशुंच्या सानिध्याने प्रफुल्लित होते. तिचे आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे पुत्रवत ऋषि सदैव तिच्या सेवेत असतात असा या पूजेचा अर्थ आहे. श्रीपूजक संजीव मुनीश्वर, सुशांत कुलकर्णी, रवि माईणकर, आशुतोष जोशी यांनी ही सालंकृत पूजा बांधली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच अंबाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले. आवारात सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिरात उत्साह आणि चैतन्याचे रंग भरले.

भाविकांची सर्वतोपरी काळजीपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. सुसज्ज दर्शन मंडप, रांगांमध्ये पिण्याचे पाणी, लॉकर्स, चप्पल स्टॅन्ड, प्रथमोपचार केंद्र, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह अशा सोयी आवारात उभारण्यात आल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर