शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

Navratri 2024: जोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा, धुपारती सोहळ्यानंतर डोंगरावरील सर्व मंदिरात बसले घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 3:10 PM

यंदा श्री जोतिबाचा जागर आठव्या दिवशी 

जोतिबा: दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाच्या नवरात्रोत्सवास आज, गुरुवारपासून धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. पहिल्या माळेला  जोतिबाची नागवल्ली पानातील महापुजा बांधून धुपारती सोहळ्याने डोंगरावरील सर्व मंदिरात घट बसविण्यात आले. आज, पहाटे घंटानाद करुन मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या.  आज घटस्थापनेनिमित्त नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधली होती. सकाळी ९ वाजता श्री'चे पुजारी उंट, घोडे, देव सेवक यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळ्याला सुरवात झाली. धुपारती सोहळा मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले.धुपारती सोहळ्यानंतर जोतिबा, काळभैरव, महादेव मंदीर, चोपडाई देवी, यामईसह इतर सर्व मंदिरात घट बसवण्यात आले.  या सोहळ्यावेळी जोतिबा देवाचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्या सह गावकरी, पुजारी उपस्थित होते. आज भाविकांनी तेल अर्पण करून जोतिबाचे दर्शन घेतले. यावर्षी श्री जोतिबाचा जागर आठव्या दिवशी म्हणजेच गुरुवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने जोतिबाचा प्रसाद म्हणून लाडूच्या स्टॉलची सुरवात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Jyotiba Templeजोतिबा