जोतिबा: नवरात्र उत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवशी श्री ज्योतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी सरदारी पूजा बांधण्यात आली. आज पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या. सकाळी नऊ वाजता श्री ज्योतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी सरदारी पूजा बांधण्यात आली. यानंतर धुपारती सोहळा संपन्न झाला. या धुपारती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तीवले, सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते. भाविकांनी जोतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Navratri 2024: दुसऱ्या दिवशी जोतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी सरदारी पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 3:21 PM