जोतिबा/कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला जोतिबाची कमळ पुष्प पाच पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली.श्री. जोतिबा देव नवरात्रोत्सवात वैविध्यपूर्ण महापूजा बांधल्या जातात नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळे निमित कमळ पुष्प पाच पाकळ्यातील महापूजा बांधली.
या पुजेला आध्यात्मिक व शास्त्राचा आधार आहे. नवरात्रामध्ये कमळ भैरवाने काशीहून सुवर्ण कमळे आणून श्री. जोतिबाची पूजा बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यांचे स्मरण म्हणून आजही रंगीबेरंगी कपडयाच्या कमळ पुष्प पाकळ्या करून ही पूजा बांधली जाते.
तीन पाकळ्या या त्रिदेवात्मक अवताराचे प्रतिक आहे. दोन पाकळ्या या सगुण-निर्गुण भक्तीचे प्रतिक मानले जाते. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो. भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
तेल ' अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मंदिरात रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री १२ .३० वाजता त्रिकाळ आरती करून १ वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले .
जोतिबा मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले
नवरात्रोत्सव काळात जोतिबाचे मंदिर २२ तास खुले असते.पहाटे ३ वाजता महाघंटे चा नाद करून मंदिराचे दरवाजे उघडे जातात. रात्री १ वाजता मंदिर बंद केले जाते. इतर वेळी मंदिर पहाटे ४ वाजता उघडे आणि रात्री ११ वाजता बंद होते.
१५ वेळा तोफेची सलामी नवरात्रोत्सव काळात दररोज नऊ दिवस ९, खंडेनवमीला दोन आणि विजय द समीला ४ अशा एकूण १५ तोफेच्या सलामी धडाडतात. तोफेच्या सलामीने च धुपारती पालखीचा प्रारंभ व सांगता होत असते.