कोल्हापूर : कोरोनामुळे यंदा अंबाबाई मंदिर बंद असल्याने ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. केवळ पाच दिवसांत ३२ लाख ५५ हजार १५० इतक्या भाविकांनी देवस्थान समितीच्या वेगवेगळ्या समाज माध्यमांना भेट दिली आहे.दरवर्षी नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या एक ते तीन लाखांपर्यंत असते. यंदा मंदिर बंद असल्याने ही संख्या आता ऑनलाईन भेटीद्वारे मोजावी लागत आहे. भाविक देवीपर्यंत येऊ शकत नसल्याने देवस्थान समितीने देवीलाच भाविकांपर्यंत पोहोचविले आहे.
देवस्थान समितीच्या अंबाबाई महालक्ष्मी लाईव्ह दर्शन या थेट ऑनलाईन वेबसाईटसह फेसबुक लाईव्ह, ट्विटर, युट्युब, इन्स्टाग्राम या माध्यमांवरही देवीचे दर्शन घडविले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविक संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.पाच दिवसांतील आकडेवारी
- शनिवार (दि. १७) : ४ लाख ९९ हजार ८९२
- रविवार (दि. १८) : ५ लाख ५० हजार
- सोमवार (दि. १९) : ७ लाख ९० हजार ७००
- मंगळवार (दि. २०) : ६ लाख ४४ हजार ६८४
- बुधवार (दि. २१) : ७ लाख ६९ हजार ८७४