कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे पेल्यातील वादळ शमले आहे, लवकरच आपणास गोड बातमी समजेल, असा दावा आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.‘राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर शिर्डी येथे होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ए. वाय. पाटील अनुपस्थित होते. यावर स्वत:च खुलासा करताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ए. वाय. पाटील हे शुक्रवारी सकाळी कुटुंबासह पंढरपूरला गेले आहेत. शुक्रवारी सकाळी प्रदेश राष्ट्रवादीकडून प्रसार माध्यमांना माहिती देण्याबाबत सांगण्यात आले.त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. ‘ए. वाय.’ यांचे बंड शमले का? या प्रश्नांवर, जवळजवळ मिटलेले आहे. पेल्यातील वादळ शमले आहे. आपणास लवकरच गोड बातमी समजेल. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
‘गडहिंग्लज’ कारखान्यात भाजपसोबतराष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे सहकारी संस्था, शिक्षण संस्था, क्रीडा क्षेत्रात आम्ही राजकारण आणत नाही. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत आहोत. या सर्व संस्थांमध्ये आम्ही मांडीला मांडी लावून बसतो, असा खुलासाही आमदार मुश्रीफ यांनी केला.