शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पक्षांतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीने कारखाना गमावला

By admin | Published: May 25, 2016 9:53 PM

वाऱ्याचे रूपांतर वादळात : निवडणूक ठरली बदलत्या समीकरणाची नांदी; आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

ज्योतीप्रसाद सावंत --आजरागत पंचवार्षिक निवडणुकीत समविचारी पक्ष व संघटनांच्या मदतीने सत्तांतर घडविण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीने या निवडणुकीत मात्र अंतर्गत गटबाजी थेट चव्हाट्यावर आणत पक्षातील काही मंडळींना ते पक्षापासून बाजूला कसे होतील, याची फिल्डिंग लावल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, असा निष्कर्षही काढला; पण पक्षातून बाजूला झालेल्या अशोकअण्णा चराटी व विष्णुपंत केसरकर यांनी सेना-भाजप व स्वाभिमानीच्या मदतीने तयार केलेल्या वाऱ्याचे वादळात रूपांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर कारखाना गमाविण्याची वेळ आली. महाआघाडीची सत्ता राष्ट्रवादीच्या आर्थिक नाड्या आवळणारी तर ठरलीच; पण त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे. ‘आजरा’ साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटी यांनी निवडणुकीची चाचपणी सुरू केली होती. या चाचपणीत आपली एकट्याची ताकद पोहोचू शकत नाही, याची जाणीव झाल्याबरोबर ‘गोकुळ’चे रवींद्र आपटे, स्वाभिमानी, सेना-भाजप यांच्याशी सकारात्मक चर्चा करीत जयवंतराव शिंपी यांच्या गटासोबतही चर्चेच्या फेऱ्या सुरू ठेवल्या. सभापती विष्णुपंत केसरकर राष्ट्रवादीपासून बाजूला होणार नाहीत, असे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी जयवंतराव व अशोकअण्णा एकत्र येणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेत जयवंतरावांना सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठांना घेण्यास भाग पाडले.जयवंतराव हाताला लागल्यानंतर सुधीर देसाई, उदय पवार यांनी विष्णुपंत यांची गरजच नाही, अशा पद्धतीने विधान करण्यास सुरुवात केली. केसरकर यांनी वेळीच सावध पवित्रा घेतला. उमेदवारीकरिता फरफटत जावे लागत असेल, तर निवडणुकीत आपली ‘गेम’ होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीची संगतच नको, असे म्हणत थेट अशोकअण्णांशी हातमिळवणी केली.विष्णुपंत यांची ताकद माहिती असणाऱ्या अशोकअण्ण यांनी फारसे न ताणवता विष्णुपंत यांना सोबत घेतले. येथूनच कारखाना राजकारणाने खरी कलाटणी घेतली. अशोकअण्णा व विष्णुपंत यांनी राजकीय धूर्तपणा दाखवीत तातडीने आघाडीचे उमेदवार जाहीर केले. या सर्व गडबडीत राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे यांना राष्ट्रवादीशी जवळीक करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.प्रत्येक गटात नेटका उमेदवार, पाठीशी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यामुळे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडी, स्थानिक मंडळी विजयाचा दावा करू लागली; पण आघाडीचे उमेदवार जाहीर होईपर्यंत महाआघाडीने प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्याबरोबरच नाराजांची नाराजी दूर करण्यात यश मिळविले.खासदार राजू शेट्टी, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, ‘गोकुळ’चे बाबा देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, तानाजी देसाई, सुनील शिंदे, माजी आमदार संजय घाटगे, महादेवराव महाडिक, सदाभाऊ खोत यांच्या सभांना एकीकडे प्रचंड प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे आमदार मुश्रीफ, पाटील यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही.काँगे्रस-राष्ट्रवादीची अनेक मंडळी महाआघाडीसोबत दिसत होती. उत्तूर व पेरणोली गटाने राष्ट्रवादीला फारशी साथ दिली नाही. आमदार संध्यादेवींनी विष्णुपंतांना दुखावू नये, असा निकटवर्तीयांनी कानमंत्र दिल्याने त्या पंधरा दिवसांत कुठेच दिसल्या नाहीत. अशोकअण्णांनी मात्र राष्ट्रवादीचे अनेक मोहरे टिपले. ‘त्यांचे काय येते ?’ असा प्रश्न विचारण्यापलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फारसे काही केले नाही.निकालानंतर मात्र महाआघाडीने सुरुंग कुठे पेरले होते. हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसला समजले; पण तोपर्यंत राष्ट्रवादीने कारखाना गमावला, त्याचबरोबर कार्यकर्तेही गमावले.भाजपने दोन जागांसह कारखान्यात सन्मानाने प्रवेश मिळविला. सेना, स्वाभिमानीलाही प्रतिनिधित्व मिळाले आहे. तब्बल विद्यमान दहा संचालकांना मात्र कट्ट्यावर बसावे लागले आहे.-आजरा कारखाना निवडणूक -विश्लेषण