शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

“राज ठाकरे यांच्याबद्दल मराठी माणूस म्हणून अपेक्षा, भ्रमनिरास होवू नये”; हसन मुश्रीफ यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 12:52 PM

राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

 कागल:राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली, यात राजकारण काय आहे, हे माहीत नाही. पण एक  मराठी माणूस म्हणून माझ्यासह राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

अदित्य ठाकरे हे अभ्यासू युवा मंत्री आहेत, असेही प्रशस्तीपत्र त्यांनी दिले. कागल येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी  बोलत होते. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपा प्रदेश अध्यक्ष चद्रंकात पाटील यांनी जी वक्तव्ये केली, ती चुकीची होती. जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलण्याचे कोणतेही कारण नव्हते. ज्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुर जिल्ह्यातील त्यांचे गाव असलेल्या खानापूरची ग्रामपंचायत जिंकता आली नाही. कोल्हापुर जिल्ह्यात भाजपाची  कोठेही सत्ता नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

आमदार होण्यासाठी कोल्हापूर सोडून कोथरूडला पळून गेले. एका महिलेची आमदारकी काढून घेतली. ते चंद्रकांत पाटील शरद पवारांना आम्ही माढातून घरी पाठविले, असे म्हणतात. हे हास्यास्पद आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. शरद पवारांना पराभुत करणारा आणि घरी पाठविणारा अजून जन्माला यायचा आहे. तेव्हा तोंड सांभाळून बोला. पवारांच्या बाबतीत अशी विधाने आम्ही खपवून घेणार नाही, अशा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला. 

खासदार संजय राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना महानगरपालिका निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान चद्रंकात दादा कसे देऊ शकतात. पाच वर्षे राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री राहूनही तुम्हाला स्वतःचा मतदार संघ का नाही. याचे आत्मपरीक्षण आधी करा, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. 

टॅग्स :Politicsराजकारणkagal-acकागलkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार