शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापूर: कागल नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्षांचा मुश्रीफांना 'रामराम', भाजपमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 2:07 PM

माळी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हातातील घड्याळ काढून कमळ हाती घेतले.

जहॉगीर शेख

कागल : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागल तालुक्यात तर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या टीकाटिपण्णीमुळे वातावरण तापले आहे. यातच आज, गुरुवारी घाटगे गटाने मुश्रीफ यांना जोराचा धक्काच दिला.

कागल नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा माणिक माळी आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी आज मुश्रीफ गटास रामराम करीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील घाटगे यांच्या निवासस्थानी त्यांनी हातातील घड्याळ काढून कमळ हाती घेतले. यावेळी वीरेंद्रसिंह घाटगे प्रमुख उपस्थितीत होते.  रमेश माळी यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश माजी मंत्री आमदार मुश्रीफ यांना धक्का देणारा आहे. माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांनी मुश्रीफ गटातून झालेले प्रवेश हे पहिले डोस आहेत. लवकरच बुस्टर डोस देऊ असे भाष्य केले होते. त्यावेळेपासुन रमेश माळी यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आज त्यावर शिक्कामोर्तब झाला.रमेश माळी हे गेली पंचवीस-तीस वर्षे कागल शहराच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रीय आहेत. मुश्रीफ गटात काम करतांना स्वातंत्र्य दिले गेले नाही. असा आरोप रमेश माळी यांनी भाजप प्रवेशा दरम्यान केला आहे. यावेळी गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे,  राजेंद्र जाधव, युवराज पसारे, बाळासो हेगडे आदी उपस्थित होते.माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील काही दिवसापासून समरजित घाटगे यांनी मुश्रीफांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे