इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयामध्ये आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेवक मदन कारंडे व बांधकाम सभापती उदयसिंग पाटील यांनी या साहित्याचे वाटप केले.
शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या कठीण काळातही महामारीशी लढण्यास आयजीएम रुग्णालय सक्षम आहे. रुग्णांना चांगल्या प्रकारची सुविधा दिली जात आहे. आयजीएम रुग्णालयामध्ये आसपासच्या गावातील तसेच कर्नाटकातील रुग्ण येत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असून, आरोग्य साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुडवडा भासू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ऑक्सिजन प्लांटच्या कामाची पाहणी करून कामाबाबत योग्य त्या सूचना नगरसेवक कारंडे यांनी दिल्या. तसेच रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत आवश्यक साहित्य देणार असल्याचे सांगितले. यावेळी नितीन कोकणे, प्रधान माळी, बाबूराव जाधव, अभिजित रवंदे उपस्थित होते.
फोटो ओळी
२००६२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाला शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून आरोग्य साहित्य देण्यात आले.