गडहिंग्लज शहरात डेंग्युसदृश लक्षणाचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरातील गटारींची पाहणी केली. त्यानंतर डेंग्यूचे संक्रमण रोखण्यासाठी औषध फवारणीचा निर्णय घेतला.
शहराच्या पाहणी दौ-यात उदय जोशी, किरण कदम, सुरेश कोळकी, नगरसेवक हारूण सय्यद, दीपक कुराडे, शुभदा पाटील, सिद्धार्थ बन्ने, गुंडू पाटील, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, संतोष कांबळे, अमर मांगले आदी सहभागी झाले होते.
नगरपालिकेने नालेसफाई व कचरा वेळच्यावेळी न उचलल्यामुळे तसेच औषध फवारणी न केल्यामुळे शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत, असा आरोप पत्रकातून राष्ट्रवादीने केला आहे.
फोटो ओळी : राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी गटारी व स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी उदय जोशी, किरण कदम, हारूण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे व कर्मचारी उपस्थित होते.
क्रमांक : २२०६२०२१-गड-०६