मालवण : गेल्या दोन वर्षांत राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांमुळे पक्षाची पीछेहाट झाली. पक्षश्रेष्ठींनी ज्यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सांभाळायला दिली होती, त्यांनी सत्तेच्या लोभापायी पक्षाशी गद्दारी केल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. मात्र, आता आगामी पालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना वाढविताना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष लवकरच जिल्ह्यात उभारी घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक यांनी व्यक्त केला. मालवण तालुका राष्ट्रवादीच्या २९ जुलै रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याची नियोजन बैठक मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे अबिद नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शहर अध्यक्ष भाई कासवकर, नगरसेविका दर्शना कासवकर, शीला गिरकर, प्रमोद कांडरकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेविका रेजिना डिसोजा या उपस्थित नसल्या तरी त्यांचे पती आगोस्तीन डिसोजा हे उपस्थित होते.‘त्या’ नगरसेवकांबाबत मेळाव्यात निर्णयमेळावा नियोजन बैठकीला मालवणातील राष्ट्रवादी नगरसेवक राजन वराडकर, महेंद्र म्हाडगुत आणि पूजा करलकर यांनी दांडी मारली. त्याबाबत विचारले असता, नाईक यांनी सारवासारव त्या नगरसेवकांवर कारवाई करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही तसेच त्यांच्याकडून पक्षाशी कोणताही पत्रव्यवहार झाला नाही. त्यामुळे ओरोस येथे होणाऱ्या मेळाव्यात उपस्थित न राहिल्यास पक्ष वरिष्ठांकडून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. पालिका निवडणुकीच्या आघाडीबाबत त्यांनी अद्याप निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ओरोस येथे २९ ला कार्यकर्ता मेळावासिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथील शरद कृषी भवन येथे शुक्रवार, २९ जुलै रोजी होणार आहे. या मेळाव्यात जिल्हा प्रभारी हसन मुश्रीफ हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात जिल्ह्यातील आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुका यांची रणनीती व पक्ष संघटना मजबुतीकरणावर भर दिला जाणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.जिल्हा मेळाव्याची कणकवली, मालवण आणि वैभववाडी तालुक्यांची जबाबदारी आपण व जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डांटस यांच्याकडे आहे. देवगड नंदू घाटे, दोडामार्ग सुरेश दळवी, कुडाळ, वेंगुर्ले प्रसाद रेगे, तर सावंतवाडी प्रवीण भोसले यांच्याकडे देण्यात आली आहे, असेही नाईक म्हणाले.
गद्दार नेत्यांमुळेच राष्ट्रवादीची पीछेहाट
By admin | Published: July 21, 2016 9:56 PM