लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : तालुक्यातील १९ गावांच्या सरपंच व उपसरपंच निवडी मंगळवारी पार पडल्या. बहुतेक ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. यातील नऊ गावांतील सरपंचपदावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली. काँग्रेसला चार ठिकाणी, स्थानिक आघाडी तीन ठिकाणी, तर शिवसेना, जनता दल व शेकाप यांना प्रत्येकी एक ठिकाणी संधी मिळाली. उपसरपंच निवडीत काँग्रेस नऊ, राष्ट्रवादी पाच, शिवसेना एक, भाजप एक, स्थानिक आघाडी तीन अशी स्थिती राहिली. ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या यातील बहुतांश ठिकाणी स्थानिक सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाड्या करून लढविल्या होत्या.
सरपंच व उपसरपंच निवडी याप्रमाणे :
कंथेवाडी- जयश्री प्रदीप पाटील- जनता दल, अरुणा संजय भोपळे- कॉग्रेस. हेळेवाडी- विध्या धनाजी पाटील- राष्ट्रवादी, सदाशिव कृष्णा पाटील- शिवसेना. चाफोडी तर्फ असंडोली- नारायण राऊ राणे -राष्ट्रवादी, सागर बळवंत पाटील- काँग्रेस. सावर्दे-वडाचीवाडी- तुकाराम सीताराम यादव- शिवसेना, बाळासो बाबू धोंड- राष्ट्रवादी. बुरंबाळी- माधवी विष्णु चौगले -काँग्रेस, जावेद रहिमतुल्ला मोमीन- काँग्रेस. पनोरी- तुकाराम राऊ परीट -काँग्रेस, स्वप्निल भगवान पातले - भाजप. खिंडीव्हरवडे- सपना राजकुमार पाटील- राष्ट्रवादी,धनाजी महादेव सावंत- काँग्रेस. बुजवडे- सुनीता आनंदा पाटील- राष्ट्रवादी, बंडोपंत शामराव पाटील - शिवसेना. कोनोली तर्फ असंडोली- दगडू गणू कुपले, संगीता आनंदा सुतार- महाविकास आघाडी. म्हासुर्ली- मीना भीमराव कांबळे - राष्ट्रवादी, राजेंद्र सखाराम पाटील - राष्ट्रवादी. गवशी- शिवाजी कुंडलिक पाटील - राष्ट्रवादी, गीता नामदेव सुतार- राष्ट्रवादी, तळाशी- चंद्रकांत विठ्ठल जाधव, स्वाती विजय जाधव- स्थानिक आघाडी. ऐनी- शोभा बंडोपंत कुसाळे - राष्ट्रवादी, चंद्रकांत जोती कांबळे - नरतवडे. वंदना सुधीर शिंदे- राष्ट्रवादी, विलास जोतिराम सावंत- काँग्रेस. पंडेवाडी- रसिदा रसूल मुल्लाणी - कॉग्रेस, शिवाजी सुभाष चौगले - काँग्रेस. आणाजे- मोहन शंकर पाटील- शेकाप, दीपाली किसन पाटील - कॉग्रेस. गुडाळ- अश्विनी अभिजित पाटील - काँग्रेस, दत्तात्रय महादेव कोथळकर- राष्ट्रवादी, राजापूर- अलका संजय टिपुगडे - राष्ट्रवादी, शिवाजी तुकाराम पाटील- राष्ट्रवादी, कोदवडे- मंगल धनाजी पाटील, विष्णुपंत बाबू पाटील- स्थानिक आघाडी.