शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

खबरदारी! पुराआधीच कोल्हापुरात एनडीआरएफची टीम तैनात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत

By इंदुमती सूर्यवंशी | Published: July 17, 2023 7:28 PM

संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोटी, लाईफ जॅकेटसारख्या बचावाच्या अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज

कोल्हापूर : जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी सोमवारी एनडीआरएफची एक टीम कोल्हापुरात दाखल झाली. यापूर्वी आलेल्या दाेन महापुरांच्या अनुभवावरून जुलै महिन्यातील शेवटचे १० दिवस कोल्हापूरसाठी हायअलर्ट असतात. पूर आलाच तर ऐनवेळी धावपळ नको म्हणून राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही टीम कोल्हापूरला पाठवली आहे. तर संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बोटी, लाईफ जॅकेटसारख्या बचावाच्या अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज झाले आहे.कोल्हापूरला २०१९ व २०२१ साली २० जुलैपासून पुढील चार ते आठ दिवसात पावसाने झोडपून काढले होते. या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात महापूर आला. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी यापुढील चार दिवसात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात पूर आणण्यासाठी पावसाला फक्त चार दिवस पुरेसे असतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे राज्य शासनाने पूर्वतयारी म्हणून कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सहा जिल्ह्यांना एनडीआरएफचे पथक पाठवले आहे.सोमवारी एनडीआरएफची २१ जणांची तुकडी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी ११ वाजता पथकाचे प्रमुख पुरुषोत्तम सिंह, फुंदे जालिंदर यांच्यासह टीमने जिल्हाधिकारी राहुल रेखावार व निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांची भेट घेतली. सध्या तरी ही एकच टीम बोटींसह दाखल झाली असून गरज पडली तर आणखी टीम पाठविण्यात येणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर