कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगडसह गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. ‘घटप्रभा’ व ‘कोदे’ धरण तुडुंब झाले असून, सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.पाऊस एकसारखा सुरू नसला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पंधरा-वीस मिनिटे येणाऱ्या सरीने सगळीकडे पाणीच पाणी होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४४.९७ मिलिमीटर पाऊस झाला.
शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, गगनबावड्यात तब्बल १०५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
घटप्रभा व कोदे धरण पूर्ण भरल्याने त्यातून अनुक्रमे प्रतिसेकंद ५४१८ घनफूट व ५९९ घटफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीला फुग आली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले जात आहे. ‘तुळशी’, ‘वारणा’, ‘कासारी’, ‘कडवी’, ‘कुंभी’, ‘जांबरे’ ही सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.
पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून, तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील एस. टी.सह इतर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.‘तरणा’ जोरदार बरसणार!शुक्रवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सूर्याने ‘पुनर्वसू’ नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्र काळात पडणाºया पावसाला ‘तरणा’ पाऊस म्हणतात. वाहन ‘बेडूक’ असल्याने ‘तरणा’ जोरदार बरसण्याची शक्यता आहे.
दीड लाखाचे नुकसानशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात आठ कच्च्या तर तीन पक्क्या घरांची पडझड झाली आहे. यामध्ये दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
प्रमुख धरणातील पाणी साठा ‘टीएमसी’ व टक्केवारी-धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारीराधानगरी ८.३६१ ३.४८ ४२तुळशी ३.४७१ १.८५ ५३वारणा ३४.३९९ १८.४७ ५४दूधगंगा २५.३९३ ९.८६ ३९कासारी २.७७४ १.४३ ५२कडवी २.५१६ १.५८ ६३कुंभी २.७१५ १.५४ ५७पाटगाव ३.७१६ १.७८ ४८चिकोत्रा १.५२२ ०.२० १३चित्री १.८८६ ०.६६ ३५