समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सॅनिटायझरपासून मास्कपर्यंतच आणि थर्मल स्कॅनरपासून ते व्हेन्टिलेटरपर्यंत १० कोटी रुपयांच्या वैद्यकीय साहित्याचा जिल्ह्यातील दवाखान्यांना आणि शासकीय कार्यालयांना पुरवठा केला आहे.
गेल्या दीड महिन्याभरापूर्वी जेव्हा कोरोनाबाबत दक्षता घेण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरपासून अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध होण्यात अडचण निर्माण झाली होती. कारण देशभरातून केवळ आणि केवळ याच वस्तूंची मागणी वाढल्याने पुरवठा लवकर होत नव्हता, तर शिल्लक वस्तू संपल्या होत्या.
मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी याबाबतचे तत्काळ नियोजन केले. त्यानुसार तातडीने सर्व प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली.
परंतु कमी कालावधीत या सर्व वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याची गरज होती. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांची मित्तल यांनी औषध भांडार आणि वितरणाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली. त्यांनी औषध निर्माण अधिकारी योगेश बिल्ले यांच्या सहकार्याने मिळालेल्या मनुष्यबळाच्या आधारे ही कामगिरी चोखपणे पार पाडली आहे. औषध खरेदीची प्रक्रिया आरोग्य विभागाने राबवली.
जिल्ह्यातील ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४२५ उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयांसारखी २३ रुग्णालये, सीपीआर या सर्व आरोग्य संस्थांना जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ज्या ज्या ठिकाणी कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले त्या त्या सर्व रुग्णालयांनाही या साहित्याचा पुरवठा करण्यात आला.
पाणी पुरवठा विभागाच्या २ गाड्या, आरोग्य विभागाची आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची एक गाडी आणि गरज भासल्यास त्या त्या तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या गाड्या वापरून औषधे आणि वैद्यकीय साहित्य बाराही तालुक्यांना पोहोच करण्यात आले आहे.आतापर्यंत वितरित साहित्यहॅण्ड सॅनिटायझर १00 मि.ली. ८६४0 बाटल्याहॅण्ड सॅनिटायझर ५00 मि.ली. ३२९0५ बाटल्याहॅण्ड सॅनिटायझर ५ लिटर ३0 कॅनहॅण्ड सॅनिटायझर २0 लिटर २५ कॅनट्रिपल लेअर मास्क १ लाख ९५ हजार ३३८एन ९५ मास्क ५४ हजार १५५ग्लोव्हज १ लाख २१ हजार १८५लिक्विड मेडिक्लोअर २00 मि.ली. ७७५५ बाटल्यालिक्विड मेडिक्लोअर ५ लिटर ५७७७ कॅनपीपीई कीट नियमित ९३९७पीपीई कीट मान्यताप्राप्त ३१0५स्राव घेण्यासाठीचे किट ३0५२एचसीक्यू गोळ्या ८0६८0थर्मल स्कॅनर २३८व्हेन्टिलेटर ९
जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत युद्धपातळीवर प्रयत्न करून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून घेण्यात आले आहे. त्याचे वितरणही नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. कोल्हापुरातील २५ हून अधिक शासकीय कार्यालयांनाही सॅनिटायझरपासून मास्कपर्यंतचे साहित्य वितरित करण्यात आले आहे.डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. कोल्हापूर