लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सहकारामध्ये आता बºयापैकी स्वयंशिस्त आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवस्थापनात चांगली सुधारणा होऊ लागली आहे. ९७ व्या घटना दुरुस्तीने सहकार हा आता जनतेचा मूलभूत हक्क असून बँकांमधील स्पर्धेच्या युगात सहकाराला प्रगतिपथावर नेऊन, टिकवायचा असेल तर त्याला स्वायत्तता देण्याची गरज आहे, असे मत सहकार खात्याचे निवृत्त अप्पर आयुक्त व निबंधक दिनेश ओऊळकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
महाराष्टÑ राज्य सहकारी संघाच्या शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनतर्फे कोल्हापूर येथे पाच जिल्'ांतील नागरी सहकारी बँकांच्या संचालक व पदाधिकाºयांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी राज्य सहकारी संघाचे अप्पर निबंधक उत्तमराव इंदलकर, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, राज्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील, मुख्याधिकारी एस. एस. बोडके, असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, उपाध्यक्ष महेश धर्माधिकारी, आदी प्रमुख उपस्थित होते.
कार्यशाळेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्'ांतील नागरी सहकारी बँकांचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.ओऊळकर म्हणाले, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टद्वारे रिझर्व बँक सहकारी बँकांवर संपूर्ण नियंत्रण आणू पाहत आहे. सहकारी बँका त्यांना कमी करावयाच्या आहेत, असे असले तरी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सर्वसामान्यांसाठी बँका चांगले काम करत आहेत, असा सकारात्मक अहवाल दिला आहे.यावेळी निपुण कोरे, उत्तमराव इंदलकर, अरुण काकडे यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रतापराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. शंकर मांगलेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल शिंदे यांनी आभार मानले.यावेळी असोसिएशनचे संचालक राजेंद्र जाधव, अरुण आलासे, शिरिष कणेरकर, सूर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, दत्तात्रय थोरावडे, दत्तात्रय राऊत, विश्वास चौगले आदी उपस्थित होते.