कोल्हापूर : धावपळीच्या जीवनात वेळ, पैसा, श्रम या व इतर गोष्टींचा अपव्यय टाळण्यासाठी वधू-वर मेळाव्यांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कोल्हापूर वीरशैव समाजातर्फे वीरशैव वधू-वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे होते. अक्कमहादेवी मंडपात हा मेळावा झाला.
यावेळी १६५ युवक व २०३ युवतींनी सहभाग घेतला. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे व वसंतराव सांगवडेकर यांचा सत्कार झाला. इचलकरंजी नगराध्यक्ष अलका स्वामी, राज्य व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेविका उमा बनछोडे, वीरशैव बँकेच्या उपाध्यक्ष रंजन तवटे, नानासाहेब नष्टे, डॉ. सतीश घाळी, राहुल नष्टे, गजानन सावर्डेकर, डॉ. गिरीश कोरे, ॲड. सतीश खोतलांडे आदी उपस्थित होते.
फोटो : १३०२२०२१ कोल : कोल्हापुरात वीरशैव समाज वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन प्रबु्द्धचंद्र झपके यांच्या हस्ते झाले. यावेळी सुनील गाताडे, अशोक स्वामी, राजू वाली, नानासाहेब नष्टे, अनिल सोलापुरे, राजेश पाटील, उमा बनछोडे, अलका स्वामी, रंजना तवटे उपस्थित होते.