कसबा तारळे : सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी जनतेच्या प्रश्नांची कणव आणि मातीशी दृढ नाते असणारा आपलाच माणूस त्याठिकाणी असणे गरजेचे आहे. तसेच साहित्यिक, पत्रकार यांनीही आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न उचलून धरले पाहिजेत, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील यांनी केले.
कुडूत्री (ता. राधानगरी) येथे राधानगरी तालुका साहित्य संस्कृती मंचच्यावतीने सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व निवृत्त मुख्याध्यापक एस. के. पाटील होते. प्रारंभी कथाकार मारुती मांगोरे यांनी स्वागत तर मधुकर मुसळे यांनी प्रास्ताविक केले.
महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. जालंदर पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त घोंगडी, काठी, आसूड, शाल देऊन पी. बी. कवडे, एस. के. पाटील. अनिल बडदारे, बंडोपंत किरुळकर, संजय डवर, आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी एस. के. पाटील, पी. बी. कवडे, मधुकर मुसळे, राजेंद्र पाटील, प्रा. पी. एस. पाटील, संजय डवर, आदींनी मनोगत व्यक्त केली. दिगंबर टिपुगडे यांच्या गीत संग्रहाचे प्रकाशन प्रा. जालंदर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राधानगरी तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक एरुडकर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक नेते बंडोपंत किरुळकर, पी. बी. कवडे, अनिल बडदारे, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. बी. के. पाटील, मधुकर मुसळे, मारुती मांगोरे, संजय डवर, तानाजी पाटील, विक्रम वागरे, दिगंबर टिपुगडे, प्रकाश कानकेकर, अशोक एरुडकर, चंद्रकांत वागरे, सुरेश डवरी, रामचंद्र चौगले, जनार्दन चौगले, रोहित पारकर, प्रकाश चौगले, रंगराव डवर, सुभाष चौगले, आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी केले तर बी. के. पाटील यांनी आभार मानले.
-
फोटो कॅप्शन १३ जालंदर पाटील
कुडूत्री (ता. राधानगरी) येथे राधानगरी तालुका साहित्य-संस्कृती मंचच्यावतीने सेवानिवृत्तीनिमित्त प्रा. डॉ. जालंदर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बंडोपंत किरुळकर, मधुकर मुसळे, एस. के. पाटील, राजेंद्र पाटील, अनिल बडदारे, संजय डवर आदी उपस्थित होते.