सडोली (खालसा) : माता आणि बालके सदृढ राहण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज असून, अंगणवाडी सेविकांनी तळागाळातील महिलापर्यत हे अभियान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन करवीरच्या माजी सभापती आश्विनी धोत्रे यांनी केले.
देवाळे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प करवीर बीट हसूर अंतर्गत पोषण माह अभियान शुभारंभप्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शालन पाटील होत्या.
या वेळी पोषण अभियान रॅलीचे उद्घाटन उपसरपंच संजय धुमाळ यांच्या हस्ते, ग्रामसेवक प्रवीण खराळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सरपंच शालन पाटील, उपसरपंच संजय धुमाळ, सर्जेराव पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल सरनाईक, सविता पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, मदतनीस उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सोनल पाटील यांनी केले. उपसरपंच संजय धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.